शिवसेना किसान सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने संग्रामपूर तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप सुरू
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Nov 2022, 6:50 PM
(स्वप्निल देशमुख) संग्रामपुर - दिवाळी संपली तरी सुद्धा संग्रामपूर तालुक्यातील 68 गावांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नव्हता मात्र गत आठवड्यात शिवसेनेचे किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आनंदाचा शिधावाटप करा अन्यथा 15 नोव्हेंबर पासून आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू असा इशारा १ नंबर रोजी तहसीलदार यांना दिला होता या आंदोलनाचा धसका घेत पुरवठा विभाग व तहसील कार्यालयाने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये 3 नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा वाटप सुरू झाला आहे सद्यस्थितीत८० गावांमध्ये आनंदाचा शिधा वाटप झालेला आहे.
राज्य शासनाने दिवाळी पूर्वीच आम्ही राज्यातील नागरिकांना आनंदाचा शिधा वाटपाचा किटचे वाटप करू असा गाजावाजा केला होता मात्र दिवाळी दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी संग्रामपूर तालुक्यातील फक्त 30 गावांमध्येच आदिवासी गावांमध्येच आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता तर उर्वरित 68 गावांमध्ये आनंदाचा शिधा वाटपाचा कुठेही पत्ता नव्हता त्यामुळे शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, शुभम घाटे शिवसेना शहर प्रमुख, राहुल मेटांगे, धनंजय अवचार ,सुनील मुकुंद , शिवसैनिकांनी तालुक्यात तात्काळ आनंदाचा शिरा वाटप करा या आशयाचे निवेदन १नोव्हेंबर रोजी दिले होते या निवेदनात नमूद होते की तालुक्यातील ज्या 68 गावांमध्ये तालुक्यातील आनंदाचा शिधावाटप झाला नाही त्या गावांमध्ये तात्काळ आनंदाचा शिधा वाटप करा अन्यथा 15 नोव्हेंबर पर्यंत वाटप न झाल्यास आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक 15 नोव्हेंबर पासून तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू असा इशारा दिला होता या आंदोलनाचा व इतरही काहींनी आंदोलन केल्याने धसका घेत भाजप व शिंदे गटाच्या सरकारने दखल घेत दिवाळी संपली तरी नाग दिवाळीच्या कामात पडेल असा आनंदाचा शिधा किट उपलब्ध करून दिला व तहसील प्रशासनाने व पुरवठा विभागाने तालुक्यातील गावांमध्ये आनंदाचा शिधावाटप सुरू केला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे व शिवसैनिकांचे आभार मानत आहे.
Post Views: 186