जातपडताळणीची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ


 संजय देशमुख  07 Dec 2021, 5:03 PM
   

सोलापूर : CET परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्‍यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणीनुसार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे, असे ट्विट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व