समाजकार्य महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण शिबीर
Sanjay M. Deshmukh
2021-11-18
अकोला : स्थानिक श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण शिबीर घेण्यात आले यामध्ये समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी व खडकी परिसरातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
यावेळी ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संकेत काळे तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.केशव गोरे तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ. रावसाहेब ठोके, प्रा. डॉ. संदीप भोवते, प्रा. डॉ. सुधीर देशमुख, प्रा. डॉ. गणेश बोरकर, प्रा. डॉ. कविता कावरे, प्रा. डॉ. बळीराम अवचार, प्रा. डॉ. प्रफुल पवार, डॉ. दिपाली देशमुख, प्रा. नवनाथ बडे, प्रा. मनोहर वागतकर, प्रा. डॉ. रोहित काळे,प्रा. डॉ. अर्चना धर्मे, प्रा. डॉ. केतन वाकोडे, प्रा. डॉ. बळवंत पाटील, प्रा. डॉ. प्रेमसिंग जाधव, प्रा. पांडुरंग पाचपुते व आरोग्य विभागातील कर्मचारी यावेळी या शिबीराला उपस्थित होते.तसेच या लसीकरण शिबिरास श्रीमती राठोड मॅडम, सहा. आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला, श्री उमेश वाघ, वरिष्ठ लिपिक, समाजकल्याण विभाग, अकोला यांनी भेट दिली व प्रशंसा केली. Covid 19 च्या सर्व नियमाचे पालन करून 264 नागरिक, विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
Post Views: 459