वंचित बहुजन आघाडीचा दणक्याने महापालिका भानावर..


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Jun 2022, 2:37 PM
   


मागील वर्षी पावसाळ्यात उमरी कडून निघणाऱ्या व न्यू तापडिया नगर मधून खरप कडे जाणाऱ्या नाल्याच्या पुराचे पाणी न्यू तापडिया नगर व खरप येथील लोकांच्या घरामध्ये जाऊन अतोनात नुकसान झाले होते. व त्याची कुठली भरपाई देखील कुणाला मिळाली नाही. यावर्षी देखील ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी महानगर च्या वतीने महानगरपालिकेला शहरातील नाली सफाईसाठी वारंवार निवेदन देण्यात आले तरीसुद्धा महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  दिनांक 27/6/2022 रोजी घमिले- फावडे  घेऊन महानगरपालिका चे वाहन व कर्मचारी यांच्यासह नालेसफाईचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या आंदोलनाचे यश म्हणुन महापालिका आयुक्त कल्पना द्विवेदी यांनी खरप-न्यू तापडिया नगर येथे jcb मशीन पाठवून नाल्यातील जलकुंभी काढण्यासाठी सहकार्य केले.

    Post Views:  219


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व