लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विदर्भ विभागीय संघटक तथा संपर्क प्रमुख पदी डॉ . विनय दांदळे यांची नियुक्ती
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
05 Apr 2023, 6:04 PM
अकोला--अखिल भारतीय स्तरावरील समाजाभिमुख पत्रकार संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ह्या रजिस्टर्ड संघटनेच्या विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख म्हणून अकोल्यातील सुपरिचित साहित्यिक, लेखक, कवी तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले डॉ . विनय वसंतराव दांदळे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ . विनय दांदळे हे स्वतः वैद्यकीय व्यवसायी असूनही हे साहित्यिक , कवी , लेखक , प्रकाशक म्हणून सुपरिचित आहेत , त्यांच्या काव्यरचना व प्रबोधनपर लेख हे विविध मासिके , वर्तमानपत्र तसेच दिवाळी अंकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात , त्यांची विविध विषयांवरील एकूण ३५ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यातील तब्बल १३ पुस्तके शासनमान्य यादीत समाविष्ट असून त्यांच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत . अकोला जिल्हा मराठी भाषा समितीचे ते अशासकीय सदस्य असून विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे सचिव आहेत . शब्दगंध नावाने दरवर्षी उत्कृष्ट दिवाळी अंकही त्यांच्या शब्दगंध प्रकाशन तर्फे संपादित करीत असतात . १९८८-१९८९ पासून ते लिखाण करीत आहेत. त्यांच्या ह्या कार्याची पावती म्हणून त्यांना अश्या महत्त्वाचे पदी नियुक्ती देण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या मासिक सभेमध्ये भव्य कार्यक्रमात त्यांना इलना चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे संपादक श्री प्रकाशजी पोहरे यांचे शुभहस्ते हस्यकवी तथा व्यंगटीकाकार अनंत खेळकर, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले व ह्याप्रसंगी नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार ही मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. ह्यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ देशमुख , सचिव राजेंद्र देशमुख , प्रदीप खाडे,किशोर मानकर , प्राडॉसंतोष सुने यांचेसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 184