अक्षरभूमी शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 May 2022, 12:56 PM
   

अकोला  : नवीन शैक्षणिक सत्र 1 जुलैपासून  सुरु होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून... गायत्री परिवार , निर्भय बनो जनआंदोलन, सेवाश्री बहुद्देशीय संस्था, खडकी, मलकापूर अकोला  यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावाच्या बाजूला पारधी बेडावर चालत असलेल्या पारधी समाजाच्या मुलांसाठी, झेप संस्थेच्यावतीने अक्षरभूमी शाळा दोन युवकांनी निस्वार्थपणे मोफत शिक्षण देने चालू केली आहे .त्यामध्ये साहेबराव राठोड, मंगेश पवार हे दोन्ही युवक मेहनत घेऊन या लहान मुलांना शिकवण्याचे काम सातत्याने तीन वर्षापासून करीत आहेत. ज्या ठिकाणी शासकीय शिक्षण पोहोचले नाही ,अशा या दुर्गम भागात या युवकांनी त्या लहान मुलांना शिक्षण देण्याचे काम सातत्याने चालू ठेवले आहे. त्यांना सहकार्य व्हावे व लाहान मुले शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी यावे ,त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अकोला मलकापूर येथील गायत्री परिवार, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था खडकी, निर्भयबनो जन आंदोलनाच्या वतीने या मुलांसाठी या शाळेला नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे गजानन हरणे, मधुकर वाकोडकर, प्रमोद धर्माळे, , मंगल ठाकरे यांनी त्यांना हे शैक्षणिक साहित्य  मोफत देऊन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षणा विषयी आवड निर्माण करण्यासाठी या दोन्ही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. 

    Post Views:  378


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व