मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकट करणारा कल!
मुंबई : राज्यात युती तुटल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारला दोन वर्षे पूण झाली. गेल्या दोन वर्षात भाजपकडून हे सरकार लवकरच कोसळेल असा दावा केला जात होता. अजुनही भाजप नेत्यांकडून असा दावा केला जातोय. दरम्यान सरकार २८ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण करत असून त्यानिमित्त सकाळ ने राज्यातील सर्व मतदारसंघातून सर्व्हे घेतला आहे. यात राज्यात मध्यावधी झाल्यास कोण निवडून येईल, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण, सरकार कोणत्या आघाड्यांवर, कोणते प्रश्न हाताळण्यात यशस्वी ठरले इत्यादी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची बळकट करणारा कल दिसून येतोय. आणि देवेंद्र फडणवीसांना मात्र जनतेने मोठा इशारा दिला आहे. काय आहे नेमका कल?
मुख्यमंत्री कोण? जनतेला दिला कोणाला कौल?मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान होतेच, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामाबद्दल सकारात्मकता तब्बल ६८.३ टक्के आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकट करणारा हा कल म्हणावा लागेल. कारण, त्यांच्या कामाबद्दल निराशा असणाऱ्यांचा कौल १३.८ टक्के लोकांचाच आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार यांना सर्वाधिक पसंतीठाकरे कुटुंबातील थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरलेली पहिली व्यक्ती उद्धव ठाकरे. ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविले. २९.७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे.- देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा कौल जातो. त्यांना २२.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. भाजपला मिळालेला एकूण कौल सकारात्मक असणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरीबद्दल असमाधान असतानाही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सर्वसाधारण सकारात्मकता आहे. भाजपच्याच पंकजा मुंडे यांचे नावही सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. - राष्ट्रवादीतून अजित पवार यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांना. राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे गट असल्याची चर्चा असते. ती चर्चा सर्व्हेक्षणात उमटली आहे. देवेंद्र फडणवीस यांना जनतेचा मोठा इशाराउद्धव ठाकरेंच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा सर्व्हेक्षणातून दिला आहे. त्यांच्या कामाबद्दल थेट असमाधान असणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २८.१ टक्के आहे आणि अपेक्षेपेक्षा कमी काम होत असल्याचे १७.७ टक्के मतदान सांगते आहे. जुलैमधील विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदारांना निलंबित केले गेले. ते अधिवेशन भाजपने विधीमंडळाबाहेर घालवले. त्यानंतर भाजपला सूर गवसलेला नाही आणि फडणवीस यांनाही. हे या सर्व्हेक्षणाचा कौल अधोरेखीत करते.
महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री? याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघात स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनमत काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे.
Post Views: 307