जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टिळक पार्क रामदास पेठ येथे , योग वर्गातर्फे वृक्षारोपण


 संजय देशमुख  2024-06-06
   

अकोला-- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त" टिळक पार्क रामदास पेठ येथे , योग वर्गातर्फे वृक्षारोपण, वृक्ष फेरी आयोजित करण्यात आली होती.   

     सदर आयोजन पतंजलि योग परिवार तर्फे करण्यात आले होते. यामध्ये पतंजलि जिल्हा प्रमुख मा.डॉ सुहास काटे,भारत स्वाभिमान जिल्हा प्रमुख मा.श्री हरीशजी माखिजा, पतंजलि योग समिति सह जिला प्रमुख श्री हरीश पारवानी यांचे मार्गदर्शनाखाली सकाळ 6 ते 6.45 या वेळेत योगासने व 6.45 वाजता वृक्ष फेरी व त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. डॉ सुहास काटे सर यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद केले.
  या प्रसंगी योग साधक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
 या प्रसंगी श्रीकांत चाळीसगावकर, प्रदीप बांधवकर,किरण चौक, डॉ सुरेश राठी, सुरेश दरेकर,के एल . अप्तूरकर, हिमांशू बावीशी,रूपल दोशी, साधनाताई चौरसिया, डॉ ऋषिता मुनोत, , वंदनाताई चिंचोळकर, मिनाताई गणगणे , सुषमा चाळीसगावकर, सीमा फडणवीस, मंजिरी कुळकर्णी, छाया अग्रवाल ,विशाखा राजे, काठोळे,वर्षा अनुराधा राऊत, भाविका बाविशी, सुचित्रा पोतदार,रेणुका ढगे,छाया राऊत पाटील, , रेखा गणवीर,आरती कासट, नलिनी ताई वानखेडे, वैशाली पागृत,कोमल भगरे ,मीना देशमुख,गड्डम ताई व ईतरही महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ सुहास काटे, श्रीकांत चाळीसगावकर,रुपल दोशी, डॉ ऋषिता मुनोत, प्रदीप बांधवकर, श्री राऊत , किरण चौक, यांनी परिश्रम घेतले. शेवटी शांतीपाठ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

    Post Views:  203


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व