राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Jun 2022, 9:48 PM
   

नवी दिल्‍ली : भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/एजन्सी यांच्यामार्फत  त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि इतर सामाजिक कार्यामध्‍ये असामान्य योगदान देणा-या लोकांचा गौरव करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या कार्याला ओळख निर्माण करून देण्‍यासाठी अनेक नागरी पुरस्कार प्रदान केले जातात.
विविध पुरस्कारांसाठी नामांकने  आमंत्रित करण्यासाठी, तसेच भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांचे  सर्व पुरस्कार डिजिटल मंचावर एकत्र आणण्यासाठी सरकारने एक समान राष्ट्रीय पुरस्कर पोर्टल (https://awards.gov.in) विकसित केले आहे. पारदर्शकता आणि जन भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी  डिजिटल मंचाअंतर्गत या पुरस्‍कारांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत;  या पोर्टलचे उद्दिष्ट भारत सरकारच्या  विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांना नामनिर्देशित करण्यासाठी नागरिकांना सुविधा देणे हा आहे.
सध्या, खालील पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी खुल्या आहेत:पद्म पुरस्कार- नामांकन 15/09/2022 पर्यंत खुले आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार- नामांकन 31/07/2022 पर्यंत खुले आहे.तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहेजीवन रक्षा पदक पुरस्कार- नामांकन 30/09/ 2022 पर्यंत खुले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय दूरसंचार कौशल्य उत्कृष्टता पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहे. 

    Post Views:  217


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व