अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत माता व बालक संरक्षण कार्यक्रमांतर्गत नियमीत लसीकरण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत दीड महिने ते २४ महिन्यांपर्यंतच्या बालकांचे नियमीत लसीकरण केले जाते.
मात्र, सध्यस्थितीत मोहिमेंतर्गत ओपीव्ही, डीपीटी आणि पीसीव्ही लसीचा जिल्ह्यात तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बालकांचे अर्धवट लसीकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बाळ जन्माला आल्यानंतर त्याला २४ तासाच्या आत बीसीजी, हिपॅटायटीस बी आणी ओपीव्ही या लसी दिल्या जातात. या लसी बाळाचे क्षयरोग, यकृताच्या आजारापासून तसेच पोलिओपासून संरक्षण करतात. त्यानंतर बाळ दीड महिन्यांचा झाल्यानंतर त्याला आणखी लसी दिल्या जातात. लसीचे हे सत्र अडीच महिने, तीन महिने, ९ महिने, आणि १६ ते २४ महिन्यांचे बाळ होई पर्यंत सुरू राहते. लसीकरणाचे हे महत्त्वाचे टप्पे असतात. त्यानंतर ५ ते ६ वर्षे, १० वर्षे १६ वर्ष वयोगटातही बाळाला लस द्यावी लागते. मात्र लसीकरणातील पहिल्या टप्प्यातील ओपीव्ही, डीपीटी आणि पीसीव्ही लसींचा जिल्ह्यात तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील बहुतांश अंगनवाडींमध्ये मुलांना या लसीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पालकांना सांगण्यात आले.
या आजारांसाठी आहेत या लसी
ओपीव्ही - पोलिओपासून बचाव
डीपीटी - डांग्या खोकला, घटसर्प आणि धनुर्वातपासून संरक्षण
पीसीव्ही - न्यूमोनियापासून बचाव
Post Views: 154
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay