डॉ घारे ह्यांनी समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा केली... डॉ रविंद्र भोळे


 संजय एम.देशमुख  24 Feb 2023, 3:01 PM
   

उरुळीकांचन: डॉ तानाजी घारे ह्यांनी नियमितपणे, निरपेक्षपणे वैद्यकीय सेवा केली. ते अष्टांग योगातील नियम व आसन जगले.नियमित आपले क्लिनिक  दिवसभर सुरु ठेऊन आपल्या क्लिनिक रुपी आसनावर ते वैद्यकीय सेवा द्यायचे. अष्टांग योगातील यम, नियम जगून न थकता शेवट पर्यंत रुग्णसेवा दिली.मराठवाडा भूकंपात त्यांनी कार्य केले.विशेषतः बालकांवर अनुभवाच्या बळावर उपचार ते करीत. स्व टी एल घारे ह्यांनी समर्पित भावनेने निरंतर निरपेक्षपणे वैद्यकीय सेवा केली, असे मत  डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन चे संस्थापक व आयुष इंटरनेशनल असो उपाध्यक्ष  डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. स्व तानाजी घारे ह्याच्या शोकसभेचे डॉ मानिभाई देसाई सभागृह येथे आयोजित करण्यात आले. ह्या वेळी डॉ रविंद्र भोळे म्हणाले की समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल डॉ घारे ह्यांना पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी आपले दुःख कधीही चेहऱ्यावर येऊ दिले नाही सदा सदा हसत मुख चेहरा आता परिसरात कधीही दिसणार नाही. त्यांनी चाळीस वर्षे रुग्णसेवा देउन समाजऋण फेडले. या प्रसंगी अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. शोकसभेला महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन, डॉ मनीभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चोधरी, माजी सरपंच संतोष कांचन,ग्रामपंचायत सरपंच अमित कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन,उपस्थीत होते.ह्या प्रसंगी राजाराम कांचन, रामदास चौध री ह्यानी श्रद्धांजली व्यक्त करून मनोगत व्यक्त केलें.याप्रसंगी डॉ एम. पी. पदवाड, डॉ प्रशांत गोडसे, डॉ रविन्द्र अष्टेकर, डॉ संदीप खेडेकर ह्यानी आपल्या भावना व्यक्त करून शेवटची डॉ घारेविषयी मत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाला उरुळीकांचन डॉ वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ संतोष राठोड, डॉ समीर नना वरे, डॉ शरद गोते,डॉ गणेश आखाडे, डॉ होन व परिसरातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळीकांचन ह्यांनी केले

    Post Views:  267


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व