अकोला लोकसभा मतदारसंघ खासदाराच्या प्रतीक्षेत?


कोण हारणार? कोण जिंकणार? मतदारांचा कौल कोणाकडे!
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Jul 2023, 7:41 PM
   

 अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून वंचित झालेला आहे .अशा परिस्थितीमध्ये मतदार मात्र येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहून वाट लावणार असल्याचे चित्र अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये तयार झालेले आहे .अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ धोत्रे हे बीमार असल्यामुळे भाजपवाल्यांनी हा मतदार संघ पूर्णपणे बिमार पाडला असून अनेक विकासात्मक योजना बंद पडल्यागत परिस्थिती या मतदारसंघातील आहे .रेल्वे लाईन वरील अकोला शहरातील रेल्वेपूल कित्येक वर्षापासून पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना एकही असा मोठा प्रकल्प या मतदारसंघात अद्याप पर्यंत आलेला नाही. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद पडलेले आहेत.उलट जूने असलेले प्रकल्प ज्यामध्ये सावतराम मील, बिरला फॅक्टरी, सिंचनाचे अनेक प्रकल्प, सुतगिरण्या, अनेक अर्धवट पडलेले महत्त्वाचे रस्ते, विमानतळाचा प्रश्न, अर्धवट सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल,  अर्धवट सामाजिक न्याय भवन, अर्धवट बंद पडलेले सांस्कृतिक भवन, अकोला शहरातून गेलेल्या मोरणा  नदीवरचा प्रकल्प, असे एक ना अनेक योजना बंद पडलेला आहेत. जागरूक उमेदवार हाच लोकशाहीचा आधार परंतु अकोला लोकसभा मतदारसंघाला कोणी वाली नसल्यामुळे जनता जनार्दन मतदार मात्र जागृत झाले असून येणाऱ्या लोकसभा मतदार संघांमध्ये चित्र पलटवण्याचा मूळ अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा दिसत आहे. मतदारांमध्ये नैराश्य आलेले आहे. भाजपच्या खासदाराला कित्येक वेळा निवडून देऊनही मतदार संघ विकासापासून दूरच राहत आहे. सुरुवातीचे काही टर्म आमचे सरकार नाही .आम्ही विरोधात आहोत. हा सूर भाजपच्या लोकप्रतिनिधीनी लोकांकडे मांडला होता. परंतु आज दहा वर्षापासून देशात, राज्यात ,जिल्ह्यात भाजपचे शासन असल्यावरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण न होणे म्हणजे याला कोण कारणीभूत आहेत. हे आता मतदारांच्या लक्षात आले आहे. नुसता जात ,धर्म भावनेच्या भरोशावरील राजकारण याला अकोला लोकसभा संघातील मतदार कंटाळलेले आहे . अशा या बिकट परिस्थितीत भाजप येणाऱ्या लोकसभेमध्ये कोणाला तिकीट देते याकडे सर्व मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागून आहे. घराणेशाईचा आरोप करणाऱ्या भाजपने घराणेशाहीचा वापर केल्यास जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे मतदारांमध्ये बोलला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गटा तटात मध्ये विखुरलेली आहे. एक संघ असा पक्षाचा एकही नेता जिल्ह्यामध्ये नाही ज्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभाव राहून तो निवडून येऊ शकेल व त्या पद्धतीचे काँग्रेसचे पदाधिकारी कामाला सुद्धा लागलेले नाहीत. अजूनही एकमेकाचे पाय ओढण्यात ते धन्यता मानतात. कोणाला एकाला तिकीट मिळाल्यास बाकीचे त्याच्या विरोधात काम करण्यास तयार असल्याचे चित्र अकोला जिल्हा काँग्रेस मध्ये दिसते. त्यामुळे काँग्रेस हा अकोला जिल्ह्यात विजय खेचून आनेले असे चित्र अद्याप पर्यंत तयार झालेले नाही. काँग्रेसचे संघटन सुद्धा विखुरलेले असून गटातटा मध्ये काम करत आहे. त्याचा फटका तिकीट मिळणाऱ्या उमेदवाराला बसल्याशिवाय राहणार नाही. तर तिसरीकडे सालाबाद प्रमाणे याही पंच वार्षिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते खासदार प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आपली ताकद अजमावणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद ,पंचायत समिती ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागेल असताना सुद्धा लोकसभा, विधानसभेच्या वेळेस वंचितच्या जि प, प. स., सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या उमेदवाराला मिळणारे मतदान लोकसभा निवडणुकीत कुठे गायब होते. हा एक मोठा  प्रश्न आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत कोण युती करते यावर सुद्धा लोकसभा उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांचे भवितव्य अवलंबून आहे. तर दुसरीकडे भाजपचे हिंदुत्ववादी मतदान यावेळेस शिवसेना विरोधात असल्यामुळे त्यांचा कौल कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडतो यावर सुद्धा येणाऱ्या लोकसभा उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. तसेच हिंदुत्ववादी शिवसेना वोटिंग चा फटका भाजपच्या उमेदवाराला नक्कीच पडणार आहे. यात मात्र तीळ मात्र शंका नाही. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्वतःचा उमेदवार उभा करतो की कोणत्या पक्षाच्या उमेदवारासोबत युती करून पाठिंबा देतो यावर सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघाचे गणित बिघडू शकते. अकोला शिवसेना सुद्धा दोन गटात विभागली असल्यामुळे त्याचा नेमका फायदा कोणाला मिळतो हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यात नेत्यांचा पक्ष म्हणून सर्व परिचित असलेल्या राष्ट्रवादी कोणासोबत घरोबा करते व कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत परिवर्तित करतात या मध्ये सुद्धा शरद पवार व अजितदादा यांचे दोन गट जिल्ह्यात निर्माण झाल्यामुळे विचित्र अशी परिस्थिती जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्माण होणार आहे. हे दोन्ही गट निवडून जरी येऊ शकले नाही तरी कोणता उमेदवार पाडायचा याची ताकद मात्र या गटाजवळ नक्कीच आहे .येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे हे दोन्ही गट लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष कोणाचे काम करतात यावरच सगळं चित्र अवलंबून आहे. त्याचप्रमाणे अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी नव्यानेच बी आर एस भारत राष्ट्र समिती व आम आदमी पार्टी तसेच तिसरी आघाडी हे सुद्धा आपले उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या उमेदवाराचा फटका सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघात कोणाला बसनार व हे इतर उमेदवार कोणत्या टक्केवारी मध्ये मतदान घेतात यावर अकोला लोकसभा मतदारसंघाचे नवीन निवडून येणाऱ्या उमेदवाराचे भाग्य मतदार आपल्या मतपेटीत येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहेत .त्याकडे संपूर्ण जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलेले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार कोण?कोण हारणार याकडे सर्वच पक्षाचे उमेदवार , पदाधिकारी, कार्यकर्ते लक्ष ठेवून असून मतदान मात्र संभ्रमा अवस्थेत आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निश्चित होते. त्यामध्ये जातीचे ,धर्माचे गणित कसे जोडून येते.  मतदार आपले मतदान रुपी सर्वश्रेष्ठ मतदान अजूनही जातीच्या ,धर्माच्या नावावर करून मतदार संघाला भकास बनवण्याचे काम करतो की काय? हे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल. तसेच अकोला जिलामधे सामाजिक संस्था संघटनेचे जाड़े मोठा प्रमाण प्रमाणात असून यांचे सुद्धा जिल्ह्यातील मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव असून हे सामाजिक संस्था संघटनेवाले सुद्धा संघटित झाले असून ते सुद्धा कोणत्या उमेदवाराची बाजू उचलून धरतात व कोणत्या विचारधारेसोबत जातात यावर सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे. नाहीतर दर निवडणुकीप्रमाणे हिंदू, मुस्लिम, बौद्ध हे कार्ड वापरला जाऊन उमेदवार दिल्या जातात की काय? व त्याला मतदार कोणत्या प्रकारे प्रतिसाद देतात हे येणारी लोकसभा निवडणूकच ठरवणार आहे. मतदार राजा जागृत हो रात्र वैऱ्याची आहे.

    Post Views:  166


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व