विष्णू मोरे,पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे - पुणे महानगर परिवहनतर्फे सुरू असलेल्या बस क्रमांक MH12-XM 5229 शेवाळेवाडी( हडपसर) ते आदित्य गार्डन सिटी या मार्गावरील बस चालक नरेंद्र खरड भेकराईनगर व वाहक दादाराव भोसले शेवाळेवाडी यांचा वारजे परिसरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. जयवंत अवघडे, संजय नांगरे, कृष्णा मारणे, सतीश पासलकर, बलदेव परदेशी, रवींद्र कदम, विष्णू मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बस चालक/ वाहक यांची प्रवाशांप्रति असलेली जबाबदारी, कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध व वेळेचे भान ठेवून समर्पणाच्या भावनेने हे दोघेही कार्य करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांप्रती आपुलकीची भावना, जिव्हाळा व प्रेम ज्येष्ठ नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे दोघांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर आदर्श असे उदाहरण म्हणजे पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने बसच्या दर्शनी भागामध्ये तुळशीचे रोपही ठेवण्यात आले आहे व त्याची नित्य नियमाने पूजाही केली जात आहे. प्रवाशांप्रती असलेली आपुलकी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी कृती कौतुकास्पद आहे.
Post Views: 6