टि.व्ही फेम कलावंतांची मैफिल अकोल्यात रंगणार 12 जून रोजी


 संजय देशमुख  2022-06-10
   

अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी,रविवारी सायं 6 वा. खुले नाट्यगृह येथे दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी समर्पित कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री प्रतीक्षा देशमुख, सुर नवा ध्यास नवा फेम गायिका स्नेहल चव्हाण, सारेगमप फेम श्रृती भांडे, गणितात ७ विश्वविक्रम असणारा प्रणितकुमार गुप्ता, पं.हरिप्रसाद चौरसिया यांची शिष्या कृतिका जंगीनमठ यांचा बहारदार कार्यक्रम अकोलेकरांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात दिव्यांगांना व्हीलचेअर ,कर्ण यंत्र ,व्हाईट केन, ब्रेल बुक्स, शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रमुख अतिथी समाज कल्याण अधिकारी डी. एम.पुंडे, अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख श्री.विजय दळवी उपस्थित राहणार आहेत.दिव्यांग बांधवांची नोंदणी व प्रवेशिका मिळवण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाईन ९४२३६५००९० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रा.विशाल कोरडे, सुशांत घुगे, स्वप्नील गुप्ते, अमीत अग्रवाल, हेमंतकुमार शाह,विजय पाठक ,छाया कागदे, डॉ.वैशाली मुने, डॉ.विद्या जयस्वाल, श्वेता धावडे, स्वप्नील तायडे यांनी केले आहे.

    Post Views:  239


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व