3 रे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन रविवारी आकोल्यात


तरुणाई फाऊंडेशन कुटासा व मराठी विभाग शिवाजी महावीद्यालय चे आयोजन.....
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Feb 2023, 8:06 PM
   

अकोला : Tरुणई फाऊंडेशन, कुटासा व शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग अकोलाच्या वतीने रविवारी 12 फेब्रुवारीला सकाळी 9 ते रात्री 10 दरम्यान (कै.) डॉ. ज. पा. खोडके साहित्य नगरी, वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय येथे तिस-या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  अकोल्याच्या साहित्यिक इतिहासात गेल्या तीन वर्षापासून्  तरुणाईफाउंडेशन  हे संमेलन घेत आहे जिल्ह्यातील साहित्यिकांना स्वतंत्र व्यासपीठ मिळण्यासाठी या  संमेलनाची    सुरुवात 2019 मध्ये  करण्यात आली.
संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, उद्घाटक अ. भा. साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव अंधारे आहेत. संमेलनास आम. अमोल मिटकरी, म. रा. सांस्कृतिक व साहित्य मंडळ मुंबईचे पुष्पराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   समाजसेवक डॉप्रा. संतोष हुशे, उद्योजक सुगत वाघमारे, प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुलभा खर्चे उपस्थित राहतील. संमेलनाच्या आयोजनासाठी तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक संदिप देशमुख, कार्यवाह प्रा. डॉ. गणेश मेनकार, कार्याध्यक्ष शंकर जोगी, सचिव प्रा. देवानंद गावंडेसह गोपाल मुकुंदे, प्रशांत वरईकर, , रामहरि पिंपळकार  सुनील दिवणाले रिता देशमुख  आदी पुढाकार घेत आहेत.
संमेलनात उद्घाटन, विशेषांक प्रकाशन, पुरस्कार वितरण पहिल्या सत्रात होईल. यावेळी प्रास्ताविक संदिप देशमुख करतील. तर नारायणराव अंधारे, डॉ. गजानन नारे, तुळशीराम बोबडे मार्गदर्शन करतील. संचालन मनोज देशमुख तर प्रा. गणेश मेनकार आभार मानतील. दुस-या सत्रात सकाळी 11 ते 12 कथाकथन,   राहणार असून  अध्यक्षस्थानी   डॉ प्रा  श्रद्धा थोरात राहतील तर शाम ठक   नरेंद्र इंगळे राजनकर तिस-या सत्रात 12 ते 1 ‘साहित्य संमेलनाची खरच गरज आहे काय?’ विषयावर परिसंवाद रंगणार आहे.   अध्यक्षस्थानी प्रा किशोर बुटोले  तर सहभागी म्हणून चंद्रकांत झटाले पाटील प्रा प्रा  किरण वाघमारे स्वप्निल इंगोले राहतील तर  संचालन विशाल बोरे करतील. चौथे सत्र दुपारी 3 ते 5 यावेळेत गझल मुशायरा होईल. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संजय पोहरे राहतील. तर प्रमुख पाहूणे म्हणून किशोर बळी, देवकाताई देशमुख उपस्थित राहतील. मुशायरात निलेश कवडे, प्रविण हटकर, अरविंद पोहणकर, पंकज कांबळे, एजाज शेख, संदिप वाकोडे, मिलींद इंगळे, प्रियंका गिरी, अनुराधा दाणी, मंगेश गजभिये सहभागी होतील. संचालन गोपाल मापारी तर प्रताप वाहूरवाघ आभार मानतील. सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा होईल. अध्यक्षस्थानी आम. रणधीर सावरकर राहतील. जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ, सिने दिग्दर्शक प्रा. निलेश जळमकर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम, कॉंग्रेस प्रवक्ता कपिल ढोके उपस्थित राहतील. त्यानंतर समारोप सत्र असून त्यात प्रमुख पाहुणे प्रा मोहन खडसे प्रा वसुदा  देव प्रा भास्कर पाटील निरज् गायकवाड आदी उपस्तिती राहील  व   शेवटच्या सत्रातकवि संमेलनाचे आयोजन केले आहे त्यात आध्यक्ष सुरेश पाचकवडे. तर प्रमुख अतिथी म्हणून हिम्मत ढाळे विनय दादळे  कविता राठोड मीरा टाकरे  रावसाहेब काळे आदी विचारपीठावर  उपस्थित राहतील तर  सहभागीकवी म्हणून विशाल् कुलट गोपाल भालतिलक् चंद्रशेखर महाजन अमिता घाटोळ गोदावरी कलोरे राजाभाऊ देशमुख धीरज   चावरे गजानन छबिले वासुदेव खोपडे सुनील लव्हाळे देवानंद  गहिले कृष्णा घाडगे  विलास् ठोसर  मनोहर घुगे सिद्धार्थ तायडे रंजन तायडे गोपाल मुकुंदे  राजू चिमणकर संजय  अरबट आधी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत  तरी साहित्य संमेलनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संदिप देशमुख यांनी केले आहे.
--------------------------

    Post Views:  195


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व