कापशी रोड येथे प्रभू श्रीरामांच्या जयघोषात निघाली अक्षदा कलश यात्रा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Jan 2024, 2:00 PM
कापशी : अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिर उद्घाटनाची तारीख अगदी जवळ आली असून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील नागरीकांना अक्षता वाटण्याचा उपक्रम सुरू आहे. कापशी रोड मधील गावकर्यांना सोहळ्यांच्या निमंत्रणासाठी अक्षदा वाटप करण्यात आल्या तसेच आज श्री हनुमान मंदिर परिसरातून कलश यात्रा महिलांच्या वतीने काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिर ते सुपीनाथ महाराज मंदिर जय महाकाल मंदीर अंबिका देवी मंदिर श्री गजानन महाराज मंदिर ते गावातून महिलांनी कलक्ष यात्रा काढण्यात आली यावेळी अनेक महिलांनी कलश यात्रा मध्ये सहभागी झाल्या होत्या
या कलश यात्रा चे आयोजन जय बजरंग महिला मंडळ श्री गजानन महाराज महिला मंडळ व अंबिका देवी महिला मंडळाच्या या तिन्ही महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
Post Views: 88