कचरा करून मैदानाची नासधूस करणारे आमदार चषक !


पालघर- डहाणू स्पोर्टची तळीरामांनी लावली वाट; मैदानावर दारू बाटल्यांचा खच...!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Dec 2024, 2:18 PM
   

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या अंतर्गत ओ एस ३४ हा भूखंड पालघर डहाणू स्पोर्ट्स या करिता कवडीमोल भावात महामंडळाने दिलेला असून रोज सकाळी या मैदानावर ज्येष्ठ नागरिक दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी येत असतात तर या मैदानावर अनेक खेळाडुंनी आपले कर्तव्य गाजवून भारतीय क्रिकेट तसेच मुंबई क्रिकेट मंडळात वर्णी लावली आहे. आजही परिसरातील अनेक मुल क्रिकेट सरावासाठी या मैदानावर येत असून महिलावर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी या मैदानावर आमदार चषक आयोजित करण्यात आले होते या चषकाकरता अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या मैदानावर चारही बाजूंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच माजी पालकमंत्री, खासदार , आमदार विविध पक्षाचे जिल्हाप्रमुख यांचे फोटोचे फलकबाजीवर प्रदर्शन करण्यात आले होते तर दुसरीकडे तळीरामांची देखील मोठी व्यवस्था आयोजकांनी केल्याचे निदर्शनास आले.
एक आय स्वेन्टी कार भरून त्याठिकाणी तळीरामांसाठी विविध प्रकारच्या मद्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तर चकनासाठी मांसाहारी पदार्थांची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
परंतु हे सर्व आयोजन करताना आयोजकांनी तसेच मैदान देखभाल दुरुस्ती समितीकडून दुर्लक्ष झाल्यामुळे मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, ग्लास, डिश, गुटका खाऊन मारलेली पिचकारी, खाद्यपदार्थ फेकल्यामुळे मैदानाची अवस्था खूप बिकट झालेली असून सकाळी मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी खूप संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे क्रिकेट सरावासाठी येणाऱ्या लहान चिमुकल्या तरूण वर्गाच्या मनात हे सर्व भयानक दृश्य पाहून नेमकं काय चाललंय देव जाणे.
दरम्यान हा मैदान पालघर डहाणू स्पोर्ट्स या समितीला वाटप केलेला असून हि समीती आजरोजी मैदानाचा उत्तम रीतीने सांभाळ करत असताना आमदार चषक दरम्यान हे भयान दृश्य पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून आमदार राजेंद्र गावित यांच्या फलकावर लावलेला फोटो तळीरामांकडून अशा प्रकारे फाडण्यात आला होता की हे नेमकं चाललंय काय ?

    Post Views:  157


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व