मुंबई : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्यावर आज (1 जून) लिलावती रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया होणार होती. ती शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. राज्यतही कोरोनाचे रुग्ण काही ठिकाणी पुन्हा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही पुन्हा अलर्ट मोडवर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याच्याआधीही कोरोनाची लागण झाली होती. तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे 22 ऑक्टोबर 2021 रोजी निदर्शनास आले होते. त्यांना त्यावेळी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच राज ठाकरे यांना मोनोक्लोनल अँटीबॅाडी कॉकटेल दिलं जाणार होतं. आता पुन्हा त्यांना कोरोना झाल्याने चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते. तर आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. तर यावेळी त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आली आहे.
मास्क वापरण्यास राज ठाकरे हे गेल्या दोन वर्षात वेळोवेळी नकार देताना आणि विनामास्क फिरताना दिसून आले आहेत. ते गर्दीतही विनामास्कच वावरत असतात. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त होती आणि आत्ता तेच झालं आहे. त्यामुळे त्यांना किमान आत्ता तरी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. आज 506 नवे कोरनाचे रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. तर एकूण 2526 सक्रिय कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.
Post Views: 190
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay