डॉ मणिभाई प्रतिष्ठाणाकडून पुण्यात पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड वितरण
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या १३ जणांचा होणार गौरव
अकोला--- महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर व निती आयोग संलग्नित पुण्याच्या डॉ.मणिभाई देसाई प्रतिष्ठाणाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांना २०२३ घ्या पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.३५ वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आणि विशेषत: निराधार,अपंग आणि वंचितांसाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या ह.भ.प. प्रबोधनकार ,अपंगसेवक,आणि समाजसेवी प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या डॉ.रविन्द्र भोळे यांचे हे आयोजन आहे.ते या मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचे संस्थापक- अध्यक्ष आहेत.
येत्या २७ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर,गुंजन टॉकीजजवळ,पुणे - नगर हायवे टच, येरवडा,पुणे येथे सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून याप्रसंगी विविध मान्यवरांसोबतच अकोला येथून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख( निंबेकर) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील विविध दिग्गज पुरस्कारार्थींसह अकोला येथून दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील १३ पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे.यामध्ये प्रदिप जी खाडे,राजेन्द्रजी देशमुख,अॕड.राजेश जाधव,अंबादास तल्हार मोहन शेळके( अकोला) रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख( खामगांव,जि.बुलढाणा)स्वप्निल देशमुख,संग्रामपूर,जि- बुलढाणा)अॕड.स्मिता चिपळूणकर( कुर्ला, मुंबई) अॕड.पियाली घोष( पूणे),अमिता कदम ( ठाणे, मुंबई)पंकज राऊत,जगदिशप्रसाद करोतिया,( बोईसर,कोकण) सौ.कल्याणी किशोर मुटे(हिंगणघाट,वर्धा) यांना पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड प्रदान
करून या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.
Post Views: 159