समाजाला समाजसेवकांची गरज : प्रा. संजय खडसे
डॉ. भाऊसाहेब देशमुख जयंतीनिमित्त नेहरू पार्क येथे पुरस्कार वितरण सोहळा
अकोला : चांगला समाज घडवण्यासाठी चांगल्या समाजसेवकांची सध्या समाजाला गरज असल्याचे मत अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नेहरू पार्क येथे आयोजित समाजवीर व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपआयुक्त अण्णासाहेब बोदडे, शिवाजी महाराज लोकविद्यापीठाचे महासंचालक मंगेश देशमुख व कार्यक्रमाचे संयोजक बी. एस. देशमुख यावेळी मंचावर उपस्थित होते. हा सत्कार सोहळा पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करून त्याचे जतन केले तर नव्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा प्रा. खडसे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. समाजात काम करणार्या लोकांना पाहून आमचेही सामाजिक भान जिवंत होते आणि काम करण्याची प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी काढले. यावेळी त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातील संघर्ष कथन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
समाजात विविध क्षेत्रातील बहुमोल कामगिरी करणार्या मान्यवरांचा यावेळी समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये हरीश आलीमचंदानी, प्रभाजितसिंह बछेर, डॉ. खुशाल मापारी, प्रेमा शुक्ल, दीपिका देशमुख, अॅड. संतोष भोरे, संस्कृती वानखडे, बाळ काळणे, रहील शेख, संजय शर्मा व निशिकांत बडगे यांचा समावेश होता. जीवन गौरव पुरस्कार बापूराव झटाले गुरुजी, विनोद पाटील, डॉ. देवयानी खेळकर, डॉ. मनोज देशमुख, प्रदीप नंद व सुरेश धारिवाल यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध चित्रकार राजेश बारड व पत्रकार किरण पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधू जाधव, सूत्रसंचालन धनंजय मिश्रा, प्रकाश अंधारे व आभार प्रदर्शन मामा हरणे यांनी केले. यावेळी डॉ. भूषण मापारी, अॅड अनंत खेळकर, अॅड. सुभाष ठाकूर, विकास मुकादम, इंदुमती देशमुख, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, प्रशांत गावंडे, प्रदीप खाडे, गजानन हरणे, मनोहर इंगळे, मधुकर देशमुख, पंकज कोठारी, प्रा. अशोक पाटोकार, विनायकराव पवार, प्रा. राजाभाऊ देशमुख, संदीप देशमुख, अविनाश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश पाटील, कुणाल देशमुख, सचिन देशमुख, मोहन देशमुख, अश्विनी देशमुख, खुशाल देशमुख यांनी प्रयत्न केले.
Post Views: 313