अकोला- दि.23. - दिवाळी अंक ही महाराष्ट्राची खानदानी परंपरा असून रसिक पदार्थांप्रमाणेच वैचारिक खाद्यावर सुद्धा ताव मारतात असे उद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबईचे सदस्य युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी साप्ताहिक वऱ्हाडवृत्त या सागर लोडम संपादित दीपोत्सव दिवाळी अंकाचे विमोचन करताना काढले. वाचनसंस्कृती जोपासली जावी ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
सदर प्रकाशन सोहळ्यात अमरावती विद्यापिठा समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एच. किर्दक, माजी नगरसेवक प्रशांत भारसाकळ, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, म.रा. शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष प्रकाश चतरकर, अ.भा. वऱ्हाडी साहित्य मंच अध्यक्ष शाम ठक, अकोला जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे, यादव वक्ते, निलेश कवडे, डॉ. विनय दांदळे सौ.स्वप्नाली पिंपळकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संपादक सागर लोडम यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. महादेव लुले यांनी तर आभार पत्रकार संदिप देशमुख यांनी केले. प्रकाशन समारोहाला अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव प्रमोद देशमुख, दीपक ताजने, तुषार हांडे, बाबाराव लोडम, निलेश पिंपळकर, प्रियंका लोडम, प्रमिला लोडम, शुभांगी राऊत, अदिती राऊत, राजेश खांदेल, महेश पागृत, मुगूटराव चऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती . दिवाळी फराळ व चहापाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.