बोईसर येथे आमदार निधीतून बनवलेल्या रस्त्याचे सिमेंट काही महिन्यातच गायब होऊन रस्त्याची झाली दयनीय अवस्था! आमदार निधीचा झाला चुराडा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Mar 2024, 12:55 PM
   

(संतोष घरत) बोईसर - सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर कडून रस्त्याच्या कामाकरिता आलेल्या पैशाचे ठेकेदार योगेश पाटीलने केले नुकसान. सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर कडून बोईसरच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असताना, त्याचे नुकसान कसे करायचे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे  बोईसर गणेश नगर कालिका माता मंदिर रस्ता ,  हा रस्ता आमदार निधी मधून करण्यात आला आहे. ह्या रस्त्यासाठी ८,२०,००० /- मंजूर करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता ठेकेदार योगेश पाटील ह्यांनी अक्षरशः नुकसान केल्याचे दिसत आहे. ह्या रस्त्याबाबत तेथील नागरिकांच्या  मनात मजेशीर चर्चा सुरू आहे की ,असा रस्ता कधी आम्ही बघितला ही नाही , आणि बघणार नाही. त्यामूळे एवढा सुंदर रस्ता बनवणारा ठेकेदार योगेश पाटील ह्याला सरकारने प्रमाणपत्र देऊन, त्याचा सन्मान करावा? अशा हर्ष युक्त प्रश्न तेथील नागरिकास पडला आहे. सदर रस्त्याचे काम स्थानिक  ठेकेदारास दिले असते  तर निश्चितच रस्ता चांगला झाला असता. परंतु बाहेरच्या ठेकेदाराला काम दिल्याने त्या रस्त्याचा बोजवारा उडाल्याचा  दिसून येतो. ठेकेदारांनी रस्त्याचे काम कधी सुरू  केले आणि कधी संपले हे तेथील जनतेलाही  कळले नाही. रस्ता बनवून  काही महिने झाले असतानाच रस्ता खराब झाला असे तेथील जनतेने म्हणणे आहे.
     सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट प्रतीचे झालेले असून त्या कामामुळे त्या रस्त्याने जाणारी शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना धुळीचे प्रदूषण सहन करून आपले आरोग्य धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. आमच्या कष्टाचा जमा झालेला पैसा जर ठेकेदार अशा पद्धतीने वाया घालवत असेल तर त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून, त्याला काळया यादीत टाकावे , सदर कामाचे बील अदा न करता ते थांबून ठेवण्यात यावे  .असे तेथील नागरिकांचे म्हणणे असून  ठेकेदार भानुशाली ह्याच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होईल. ह्या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  268


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख