हणेगाव मध्ये मुख्य रस्ता बनला धसकीचा अड्डा!


बलाढय हणेगाव ग्रामपंचायत ठरली फक्त नावालाच?
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jul 2024, 3:26 PM
   

 देगलूर - देगलूर तालूक्यातील सर्वात मोठा गाव म्हणून ओळख असलेल्या हणेगाव मधील मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे.हणेगाव मध्ये मोठी बाजारपेठ असलेल्याने लोकांची आवक जावक जास्त होत असते.सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यामुळे पाऊस पडताच हणेगाव च्या मुख्य रस्त्यावर खड्डयांचे प्रमाण जास्त होऊन खड्डायात पाणी साचत आहे व चिखलमय होत असल्याने वाहन धारकांना प्रवास करत असताना खड्डयांचा अंदाज न मिळत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हणेगाव मध्ये दिग्गज लोकप्रतिनीधी जन्माला लाभलेले असून फक्त नावालाच ठरलेले आहेत ? तर या रस्त्याला काही लोकप्रतिनिधीचा झोपेतून उठताच दर्शन होतो तर काही लोकप्रतिनिधीचा प्रवास करत असताना या रस्त्याचा दर्शन होत असतो.ग्रामपंचायत च्या सत्ताधाऱ्यानी निवडणुकी दरम्यान लोकाना विकासाची मोठ मोठी आश्वासने देऊन फक्त लोकांच्या हातात भोपळा दिले असे म्हणून लोकांन मध्ये चर्चा सूरू आहे.लोकप्रतिनीधीनी ग्रामपंचायतची सत्ता काबिज करण्यासाठी आपली अस्तित्व पणाला लावली व सत्ता काबिज करून सुद्धा या रस्त्याची अवस्था दूरूस्त करण्यात अपयश ठरली.ग्रामपंचायत कडून या रस्त्यावर काही महिन्या पूर्वी मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले. पण परत पावसाळ्यात जैसे थे वैसे झाले. रस्त्याच्या खड्डायातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर होईल का म्हणून लोकांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  385


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व