उत्तर प्रदेश : पोलीस अधिकारी भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे घडली आहे. बलात्कार केल्यानंतर तरुणीला चालत्या कारमधून फेकून आरोपींनी पलायन केले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडित तरुणी ही आग्रा येथे पोलीस अधिकारी पदाची परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा दिल्यानंतर तरुणी आग्रा येथून कोसिकलन येथे जाण्यास निघाली. परीक्षा होईपर्यंत संध्याकाळ झआली होती. संध्याकाळी घरी परतण्यासाठी तरुणाला कोणतेच वाहन मिळत नव्हते. त्यामुळे तरुणीने समोरुन येणाऱ्या कारला हात दाखवत लिफ्ट मागितली. कारमध्ये आधीच तीन-चार तरुण बसले होते. तरुणी या कारमध्ये बसली. आग्र्याहून दिल्ली आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कार येताच तरुणांनी तरुणीसोबत छेडछाड सुरु केली. तरुणीने छेडछाडीला विरोध करताच अज्ञात तरुणांनी तिला मारहाण केली. त्यानंतर तरुणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर तरुणांनी पीडितेला चालत्या कारमधून कोसिकलन महामार्गाच्या कडेला फेकून दिले. रस्त्यारुन जाणाऱ्या काही लोकांनी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणीला पाहिले. त्यानंतर लोकांनी तरुणीच्या घरच्यांना याबाबत कळविले. घरच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात हजर होत तक्रार दाखल करीत प्रकरणाची चौकशी सुरु केली.
पीडितेच्या भावाने याबाबत बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तरुणीसोबत झालेल्या दुष्कर्म झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पीडितेची वैद्यकीय चाचणी सुरु आहे. लवकरात लवकर गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे एसपी देहात श्रीचंद्र यांनी सांगितले.
Post Views: 271
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay