गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा अकोला धडकणार


लोकप्रतिनिधींच्या घरावर यापुढे मंत्र्यांना कार्यक्रम घेण्यास बंदी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 Oct 2023, 9:11 AM
   

मराठाभुषण श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा अकोला चे महत्वपूर्ण बैठक पार पडली . सदर बैठकीला मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .  सदर बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले
1) 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी यांना श्री जरांगे पाटलांना आवश्यक वैद्यकीय उपचार व झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर  त्याला तीव्र प्रतिक्रिया देण्यात येईल असे निवेदन देण्यात येणार आहे . 
2) त्याच प्रमाणे 2 नोव्हेंबर रोजी अकोल्यातील लोकप्रतिनिधी  सर्व पक्षीय खासदार आमदार यांच्या घरा समोर तीव्र  आत्मक्लेश आंदोलन करण्याचे ठरले असून सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल . लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी व टिकणारे आरक्षण कसे देतील याची रूपरेषा सांगावी या साठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे . 
3) तसेच समाज बांधवांनी गावागावात विधिमंडळ व संसद लोकप्रतिनिधींना येण्यास बंदी घालावी 
4) मंत्र्यांनी या पुढे अकोला जिल्ह्यात कोणत्याच सभा कार्यक्रम करू नये अन्यथा त्यांच्या सभा उधळून लावण्यात येतील असा इशारा या बैठकीत देण्यात आला . 
यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री विनायकराव पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा गट) जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा भाऊ अंधारे , मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा सचिव श्री प्रदीप भाऊ चोरे , श्री आकाश दांदळे  सौ राखीताई  पेटकर यांनी मार्गदर्शन केले .    पुढाऱ्यांना पहिली गाव बंदी घालणारे पातूर तालुक्यातील  चरणगाव ग्रामपंचायत चे श्रीकांत देशमुख , राजेश देशमुख , सुनील देशमुख, आणि प्रकाश भिकनकळे  यांचा सत्कार घेण्यात आला . सदर बैठक दिगंबर महल्ले व धनंजय दांदळे पंचायत समिती सदस्य यांनी आयोजित केली होती .

    Post Views:  87


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व