रामाश्रय फाउंडेशन द्वारे पक्ष्यांसाठी प्याऊ व धान्य पात्रांचे वाटप
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-04-18
अकोला येथील तुकाराम चौक जवळील कोठारी वाटिका नंबर १ मध्ये काही दिवसांपूर्वी स्थापना करण्यात आलेल्या रामाश्रय फाउंडेशन द्वारे स्थानिक तुकाराम चौक येथे रविवारी सकाळी पक्ष्यांसाठी प्याऊ व धान्य पात्रांचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला सदर प्रसंगी विविध परिसरातील नागरिकांना ३०० प्याऊ व धान्य पात्र मोफत वाटप करण्यात आले प्रसंगी फाउंडेशन चे सौरभ बोन्डे, पारितोष बावस्कर, सुधन अहिर, विजय वानखडे, पवन पंचवटे, विष्णू गोटे यांनी नागरिकांना पर्यावरणासंबंधी व पक्षी संवर्धनासंबंधी माहिती देत पशु-पक्षयांसाठी जास्तीतजास्त पाणि व चाऱ्याची सोय करण्याचे आवाहन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष अभिलाष गोटे यांनी समस्त उपस्थितांना संस्थेचे उद्देश्य व पुढील उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमामध्ये परिसरातील नागरिकांनी अत्यंत उत्साहात भाग घेत फाउंडेशनच्या आगामी उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली. रामाश्रय फाउंडेशन द्वारे भविष्यामध्ये विविध उपक्रम जसे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागामध्ये चिकित्सा सुविधा देणे, महिला सशक्तीकरण, पर्यावरण जागरूकता, लघु सूक्ष्म व मध्यम व्यवसायी बांधवांना मार्गदर्शन करणे इत्यादींचा समावेश राहील.

सदर कार्यक्रमामध्ये दत्तात्रय तेलंगे, ज्ञानेश्वर पाटील, सुधीर थोरात, नंदकिशोर काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते व कार्यक्रम रामाश्रय फाउंडेशन चे पदाधिकारी, सभासद तसेच परिसरातील युवक-युवतींच्या सहभागातून यशस्वी पार पडला ज्यामध्ये शिवराज जाधव, सागर वाघ, अक्षय फोकमारे, निखिल देशमुख, अजय दराडे, अमेय गंधे, पलाश भातकुलकर, अमन सोमवंशी, अनिकेत देशमुख, नंदकिशोर ठाकरे, रवी लोहकपुरे, पियुष कनोजीया इत्यादींचा महत्वाचा सहभाग होता. रामाश्रय फाउंडेशन द्वारे येणाऱ्या काही दिवसांमध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे ऑन लाईन सेमिनार आयोजित केल्या जाणार आहेत तरी अकोल्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या इंस्टाग्राम चॅनेल ला भेट देण्याचे आवाहन सुद्धा रामाश्रय फाउंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.
Post Views: 219