डॉ पंजाबराव देशमुख पुण्यतिथी निमित्य प्रा विशाल कोरडे यांचे व्याख्यान संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Apr 2023, 10:22 AM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्रा.विशाल कोरडे यांचे १० एप्रिल २०२३ रोजी डॉ.पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त पी के व्ही अकोला येथे व्याख्यान संपन्न झाले . प्रारंभी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मंचावर डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी , डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता उद्यानविद्या, डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव व प्रा.विशाल कोरडे उपस्थित होते . प्रा.विशाल कोरडे यांनी आपल्या व्याख्यानात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक , सामाजिक , राजकीय व कृषी विषयक कार्याला उजाळा दिला.
भाऊसाहेब देशमुख यांनी घटना समितीत केलेले कार्य , महिलांसाठी केलेल्या घटनात्मक तरतुदी व विमलाबाई देशमुख यांच्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला . २८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाचता आर एल टी विज्ञान महाविद्यालय येथे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे स्वर काव्य महोत्सव आयोजित केला असून संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती त्यांनी दिली . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराच्या दृष्टीने काय करता येईल ? यावर त्यांनी साधक बाधक चर्चा केली . सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.संजीव कुमार सलामे, मुख्य संपादक तर आभार प्रदर्शन प्रा.प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता यांनी केले . सदर व्याख्यानासाठी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक , संशोधक विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Post Views: 294