शेतकरी, निराधार व असंघटीत घटकांच्या धरणे आंदोलनाची शासनाकडून दखल; चर्चेसाठी पाचारण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2024, 8:46 AM
   

किशोर मुटे - जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट - मंगलाताई ठक यांच्या नेतृत्वात गेल्या 14 दिवसापासून चिघळत  धरणे आंदोलनाची आज शासनाने घेतली दखल 
निराधार, शेतकरी व असंघटित वर्गाच्या मगण्याची आज शासन दरबारी दखल घेऊन आंदोलन मागे घेण्यास प्रशासन दरबारी बोलवण्यात आले.  ज्येष्ठ नागरिक निराधार अत्याच्यार मुक्ती संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगला ताई ठक यांच्या नेतृत्वात गेल्या 10 सप्टेंबर पासून तहसील कार्यालय हिंगणघाट चे समोर धरणे आंदोलन सुरू आहे.  14 दिवस होऊन गेले परंतु सरकार व प्रशासन दखल घ्यायला तयार नव्हते गेल्या अनेक गावातून पुरुष बांधव व महिला भगिनी नी व अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या व मागण्या रास्त असल्याचे बोलले अनेक सिनेकलाकाराणी व्हिडिओ चे मध्यमातून मंगलाताई ना पाठिंबा दिला तर काही नागपूर वरून काही मारेगाव यवतमाळ वरून सुध्धा मित्र परिवार या आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलन जास्तच चिघळू लागलं शेवटी आज 23 सप्टेंबर ला शासनाने दखल घेतली आणि शासन दालनात आंदोलनाचे सिस्ट मंडळ बोलवून चर्चा करण्यात आली व तहसील लेवल चे प्रश्न तहसील लेवल लाच निकाली करणार असे सांगितले व राज्य सरकार व केंद्र सरकार कडे निराधार संघटनेच्या मागण्या न्याया साठी पाठविनार अशी ग्वाही देऊन आज आंदोलन चर्चा करून मागे घेण्यात आले . पुढील न्यायासाठी मागण्या 
1) ५५ वर्षावरील वयोवृध्द निराधार व शेतकऱ्यांना ५००० रु. महिना मानधन मिळावा.
2)) निराधारांची उत्पन्न मर्यादा २१००० वाढून ५० हजार करण्यात यावी निराधारांना व शेतकऱ्यांना नियमित अनुदान मिळण्यात यावे.
3) घर तेथे शौचालय त्या प्रमाणे प्रत्येक राशनकार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेनेकरुन त्यांना घरघुती उद्योग करता येईल.
4) शेतकऱ्यांचा मालाचा हमी भावाचा कायदा करणे बाबत.
5) शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायम स्वरुपी पट्टे मिळणे बाबत.
6) जबरण जोत शेतकऱ्याला व जमीन धारकाला कायम स्वरुपी जमिनीचे पट्टे देणे बाबत झुडपी अंतर्गत.
7) सरकारने घरकुल मध्ये ड क्रमांक यादी थांबवून गरजूंना घरकुल योजनेपासून वंचित केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई ठक यांचे नेतृत्वात निराधार , शेतकरी व असंघटित वर्गाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय हिंगणघाट येथे आज दिनांक 10 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आज चौथा दिवसी ही धरणे सुरूच परंतु सरकार अजुन जागे झालेलं नाही या वेळी अनेक गावच्या महिला भगिनी v बांधव या आंदोलनात सामील होत आहे . दिवाकर आसोले, गजानन भोमाले, शेषराव बोयर, गीता भागत , मालू लोणकर , कुसुम नगराळे, सुमन भागत, व अनेक पुरुष माता भगिनी नी या धरणे आंदोलनात हजेरी लावली.

    Post Views:  40


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व