पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट संदर्भात न्यायालयाचे प्राथमिक चौकशीचे आदेश
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Apr 2022, 8:27 PM
पुणे : डॉ अभिषेक हरिदास व विकास कुचेकर यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कोरेगाव पार्क पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे दिले आदेश. पुण्यात एक किडनी रॅकेट प्रकरण ५ एप्रिलला समोर आले आहे. त्यामध्ये अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला आपली पत्नी म्हणून दाखविलेली कागदपत्रे आणि त्यांच्या विवाहाचे खोटे पुरावे ग्राह्य धरून ससून हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली होती. रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यानंतर प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला 15 लाख रुपये देण्याचे आमिष साळुंखे यांनी दाखविले होते; पण ते न मिळाल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. यावरून हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण खात्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली.त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयावरही कारवाई देखील केली.मंगळवारी (१२ एप्रिल) आरोग्य विभागामे कारवाई करत रूबी क्लिनिक हॉलच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला आहे. पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकसून तपासाचा अहवाल सादर होईपर्यंत लाईव्ह आणि कॅडेव्हर अशा दोन्ही प्रकारच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला आहे.
या बाबत मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर ,हरिभाऊ मंजुळे तसेच डॉ अभिषेक हरिदास यांनी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला त्यावर डॉ अभिषेक हरिदास व संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी युक्तिवाद केला त्यानंतर मे. बिराजदार कोर्टाने सदर प्रकरणात प्राथमिक चौकशीचे आदेश दिले व कोरेगाव पोलिसांना ०५ मे रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले .
Post Views: 174