मनिभाईंच्या जन्मदिनी पद्मश्री मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुस्काराने महाराष्ट्रातील नामवंत सन्मानित...!


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या १८ पत्रकारांचा सन्मान....
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-05-02
   

डॉ.भोळे यांचा ३० वर्षांचा उपक्रमांची केन्द्रसरकारकडून दखल घेण्याच्या मान्यवरांच्या अपेक्षा ...!
अकोला-  भारताच्या ग्रामविकासात अग्रणी असणाऱ्या मनिभाईंनी आयुष्यभर ग्रामसुधारणा आणि जनकल्याणाचे कार्य केले.विविध क्षेत्रात त्यांनी केलेले विकासकार्य हे उल्लेखनीय राष्ट्रकार्य  असून त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी ईतरांना कार्याच्या प्रेरणा मिळतात. असे प्रतिपादन शांती सेनेचे पुरस्कर्ते आणि सामाजिक न्यायाचे उर्जास्त्रोत असणारे पद्मश्री मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचे संस्थापक अध्यक्ष  प्रवचनन तथा प्रबोधनकार व ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रविन्द्र भोळे यांनी केले. 

           मनिभाई निती आयोग संलग्नित आणि अनेक घटनात्मक संस्थांकडून मान्यताप्राप्त मनिभाई देसाई प्रतिष्ठाच्या पद्मश्री मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या राज्यातील ठीकठीकणच्या १८ पत्रकार पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात नेत्रदिपक उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अनेक नामवंतांना सन्मानित करण्यात आले आहे.पुण्यात येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात मनिभाई प्रतिष्ठाणाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.प्रधोनकार,प्रवचनकार व निराधार,वंचितांचे अपंगसेवी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविन्द्र भोळे यांचे अध्यक्षतेखाली हा दिमाखदार भव्य सन्मानसोहळा पार पडला.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष व इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी संजय एम.देशमुख, पुष्पराज गावंडे,राजेन्द्र देशमुख,सुर्यकांत तोडकर,डॉ.आदिती कराड, जी.एस.टी व टॅक्स कमिशनर प्रसाद चौधरी,अनुव्रतश्री डॉ.ललिता जोग,लेवा पाटीदार  संघाचे अध्यक्ष निनाभाऊ खर्चे,बुलढाणा भातृमंडळाचे अध्यक्ष डी.के.देशमुख,दे.जनशक्तीचे मुख्य संपादक यतीन ढाके,लेवा जगतचे शाम पाटील, सामाजिक कार्यकर्ते,दिलीप नाफडे,मुक्ताई प्रतिष्ठाणाचे अध्यक्ष अमोल पाटील,सुधीर चंद्र उत्तम,जनरल मॕनेजर (ऑपरेशन) विराज हॉस्पिटल, लोणी काळभोर,व अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी खासदार स्व.गिरीषजी बापट यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली‌.
          यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.भोळे यांनी मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाकडून ३० वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यसेवा, वंचित, निराधार,आणि अपंगसेवेच्या आणि आपतकालिन मदतीच्या व्यापक सेवाकार्याची व पुरस्कारांनी प्रोत्साहन देण्याच्या सेवाभावी कार्याची माहिती देऊन सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.त्यांच्या निरपेक्ष आणि नि:पक्ष व निरंतर सेवाकार्यांची केन्द्रसरकारकडून पद्मश्री प्रदान  करून दखल घेतली जावी अशा अपेक्षा व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून याप्रसंगी डॉ.भोळे यांच्या कार्याला शुभेच्छा प्रदान केल्या.
       दिप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.स्व. मनिभाई देसाई आणि देसाई महापुरुषांना अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पंकज राऊत,जगदिशप्रसाद करोतिया( बोईसर) वृत्तपत्र माध्यम कायदेतज्ञ ड.स्मिता चिपळूणकर,पत्रकार अमिता कदम( मुंबई) सायबर क्षेत्रातील कायदेतज्ञ अॕड. पियाली घोष( पुणे) ज्येष्ठ पत्रकार  प्रदिप खाडे ,राजेन्द्रजी देशमुख,मोहन शेळके,पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख ( खामगांव) स्वप्निल देशमुख ( संग्रामपूर) दे युवा मराठाचे राजेन्द्र पाटील,अंबादास तल्हार,अॕड.विजयराव देशमुख,अॕड‌.राजेश जाधव,( अकोला) सुर्यकांत तोडकर ( कोल्हापूर)सौ.कल्याणी किशोर मुटे( हिंगणघाट)अभिजीत भालेराव या १८ नामवंतांसह डॉ ‌आदिती कराड,यतीन ढाके,प्रसाद चौधरी,शाम पाटील,राजीव जाधव,सुनिल इंगळे,अमोल पाटील,नितीन बोंडे,ज्ञानदेव खाचणे, डॉ ‌अंकुश पवार,सरोज सरोदे,हभप काजलताई काळे, डॉ.हरिभाऊ भापकर, विनायक बेंबडे,राजेखान एस.पटेल, डॉ.उज्ज्वला राठी,रीता राजपूत,हभप निलेश कोंडे देशमुख,ललित जाधव, भाऊसाहेब महाडीक,व्यंकटेश महाडीक,आदिनाथ ओगले,आणि अनेक पत्रकारांचा व विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांनी शाल ,राज्यस्तरीय पुरस्काराचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.
      या कार्यक्रमाला विठोबा मराठे,विजयराव बाहकर,किशोर मुटे,सतिश देशमुख,सागर लोडम,मनोहर मोहोड, डॉ.शंकरराव सांगळे,व राज्यातील ठिकठिकाणाहून आलेले पुरस्कारार्थीं वज्ञनइमंत्रइत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल.डी .साळवी यांनी तर आभारप्रदर्शन गणेश चव्हाण यांनी केले.अंकूश दळवी,प्रफुल्ल झोपे व सुनिल इंगळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    Post Views:  112


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व