उत्तर प्रदेशात सपा सुस्साट! भाजपचं टेन्शन वाढलं; ४ टक्क्यांचं गणित फिरणार?


 संजय देशमुख  29 Jan 2022, 11:32 AM
   

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर समाजवादी पक्ष भाजपला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. या निवडणुकीबद्दल टाईम्स नाऊ नवभारत आणि VETOनं जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून समोर आलेली आकडेवारी अतिशय रंजक आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला, या प्रश्नाला ५२.३ टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं उत्तर दिलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत. त्यांना ३६.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यानंतर बसपच्या अध्यक्षा मायावती (७.२ टक्के) आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (३.४ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

व्होट शेअरमध्ये सपा सुस्साट, भाजपचं नुकसान
२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्याचा फायदा भाजपला उत्तर प्रदेशात झाला. भाजपला जवळपास ४० टक्के मतं मिळाली होती. यात आता घट होऊ शकते. भाजपला ३८.२० टक्के मतं मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत सपाला केवळ २२ टक्के मतं मिळाली होती. मात्र आता सपा आणि मित्रपक्षांना ३४ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. 

कोणाला किती जागा?
गेल्या निवडणुकीत भाजपनं ३१२ जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती. आता त्यांच्या जागा २२३ पर्यंत कमी होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत ४७ जागा जिंकणारा सपा यंदा १५२ जागा जिंकू शकतो. २०१७ मध्ये १९ जागा जिंकणाऱ्या बसपला १३ जागा मिळू शकतात. 

    Post Views:  193


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व