बैलजोडी सजावट स्पर्धेत पोळ्यानिमित्त आयोजित स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-10-07
   

मंगेश चऱ्हाटे 
कापशी- कृषी संस्कृतीमधील शेतकऱ्यांचा महत्वाच्या पोळा या सणात  उत्साहाने बैलांच्या उत्कृष्ट सजावटीसाठी करणाऱ्यांचा सन्मान म्हणून कापशी येथे एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.यासोबतच गणेशोत्सवातही उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्यांसाठी पारितोषिके वितरण करून ग्रामवासियांच्या उत्साहाला व्दिगुणीत करण्याचा उपक्रम राबविला जातो. यावर्षीच्या पोळा आणि गणेशोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होऊन बैलांच्या नयनरम्य सजावटी व ऐक्याचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवातही उल्लेखनिय सहभाग नोंदवून  योगदान देणारांसाठी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  भारतमाता क्रांती आश्रम ट्रस्टच्या वतीने  संस्थापक- अध्यक्ष डॉ.शंकरराव सांगळे व युवा नेते,पत्रकार मंगेश  चऱ्हाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक सेवाव्रती,लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हूशे,तर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर, कादंबरीकार व संघटनेचे केंद्रीय  मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे,केंद्रीय पदाधिकारी,ज्येष्ठ पत्रकार अंबादास तल्हार,पत्रकार सतिश देशमुख,निंबेकर,सरपंच वेणूताई उमाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     राज्यात पोळा हा शेतकरी बांधवांचा लोकप्रिय सण असून  आपल्या बैलजोडीची सजावट करून शेतकरी त्याची पूजा करतो. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून बैल पोळा सणाचे आयोजनातील बक्षिस वितरणाचा हा कार्यक्रम  कापशी रोड येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये संपन्न झाला.२०२४  घ्या स्पर्धेत  गावातील ३५ पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.विजेत्यांच्या नावांचा  निकाल बैलपोळ्याच्या दिवशीच देण्यात  आला होता परंतू काही कारणांमुळे बक्षीस व प्रमाणपत्र देता आली नव्हती. त्यामुळे जागतिक जेष्ठ,प्रौढ नागरिक  दिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  यांच्या अध्यक्ष,प्रमुख अतिथी आणि भारतमाता क्रांती आश्रम ट्रस्टचे डॉ.शंकरराव सांगळे यांचे शुभहस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट बैलजोडी सजावट म्हणून प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह ,शाल देऊन  निवड झालेल्या शेतकरी बांधवांना गौरविण्यात आले.विविध जीवनावश्यक वस्तू सुध्दा यावेळी  भेट स्वरुपात देण्यात आल्यात. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती प्रेमभाव आणि कृतज्ञता तथा गणेशोत्सवातून गावातील धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा वृध्दींगत करण्यासाठी आणि त्यासाठी प्रोत्साहन म्हणून स्पर्धेच्या आयोजनाचा उपक्रम अतिशय  स्तूत्त्य असल्याचे प्रतिपादन  यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.
    या स्पर्धेत प्रथम क्रमांक  शेतकरी विजय किशोर केवट, द्वितीय क्रमांक बारकू  यादव  तर तृतीयांश क्रमांक सुरज अमृतलालजी केवट चतुर्थ विशाल जाधव, पाचवे कास्तकार ग्रुप ,दोन प्रोत्साहन बक्षीसे दीपक यादव, रवी केवट   यांना देण्यात आलेत. उर्वरीत शेतकर्‍यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .याप्रसंगी प्रविण निलखन,माजी सरपंच राजेश डोंगरे, त्रिगुणाबाई इंगळे,गजानन पाकदुणे, मंगेश उंबरकर,  यावेळी जेष्ठ प्रौढ महिला सिताबाई शिंदे यांच्या त्रिगुणाबाई इंगळे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश चराटे  यांनी तर आभार प्रदर्शन डॉ शंकरराव सांगळे  यांनी केले

    Post Views:  200


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व