महसूल विभागाने अभय दिलेल्या अनधिकृत बांधकामावर बोईसर ग्रामपंचायतीची जप्ती


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-07-06
   

बोईसर - (संतोष घरत)- पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामाना वेग आला आहे .अनधिकृत बांधकामा विषयी  प्रसार माध्यमे व इतर लेखी पत्राद्वारे  अनेक तक्रारी करून सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका बजावत असतानाचे चित्र बघायला मिळत आहे.
   बोईसर व आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामांना वेग आला आहे. तक्रार केल्यानंतर देखावा म्हणून थातूरमातूर , तोडक कारवाई करत महसूल विभाग बोईसर, कारवाई करतो हे फक्त दाखवायचे काम करत आहे. कारवाई केल्यानंतर लगेचच तोडलेली बांधकामे त्वरित सुरू होतात. म्हणजेच त्यांच्यावर वरदस्त हा महसूल  विभागांचे अधिकारी व कर्मचारी असतील, असे जनतेकडून बोलले जात आहे.
   वन विभाग ,सरकारी व आदिवासी जमिनीवर भूमाफियाने अनेक अनधिकृत बांधकामे सुरू केली , ह्या बाबतीत महसूल विभागास विचारणा केली असता ,आम्ही जागेवर जाऊन पंचनामा करून, काम थांबवतो  . परंतु वास्तवात तसे होताना दिसत नाही .त्यामुळे बोईसर मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
    आज बोईसर ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये गणेश नगर ह्या ठिकाणी शासनाची व ग्रामपंचायतची कोणती पूर्वपरवानगी न घेता, अनधिकृत बांधकाम  सुरू असलेल्या कामावर ठाकूर नामक इसमाच्या इमारतीवर  जप्तीची कारवाई केल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
      बोईसर स्टेशन ते नवापूर रोड व बोईसर स्टेशन ते तारापूर रोड ह्या ठिकाणी होणारी अनधिकृत पार्किंग व रस्त्यावर थाट मांडून बसणाऱ्या अनधिकृत दुकानदार व फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी , अशी शालेय विद्यार्थी ,रुग्ण ,वयोवृद्ध महिला , प्रवासी , चाकरमणी व नागरिकाकडून मागणी होत आहे.

    Post Views:  134


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व