विजय, मांगल्याचे प्रतिक भगवा ध्वज फडकणार मंदिरांवर ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे यांच्या हस्ते वितरण


 sanjay deshmukh  16 Jan 2024, 1:38 PM
   

अकोला:-
राम मंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त शहरातील १६० मंदिरात नवे कोरे भव्य भगवे ध्वज फडकणार आहेत. मंदिरांना या नव्या कोऱ्या भव्य ध्वजाचे वितरण संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे आणि निलेश गद्रे यांच्या हस्ते हे एका सोहळ्यात करण्यात आले.अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा जवळ जवळ येत आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विजयाचे, मांगल्याचे प्रतिक असलेल्या भगव्या ध्वजाचे वितरण निलेश देव मित्र मंडळातर्फे शहरात करण्यात आले आहे. शहरातील १६० मंदिरांवर हे नवे कोरे भगवे ध्वज फडकणार आहेत.  

या ध्वजाचे वितरण शहरातील विविध मंदिर व्यवस्थापन समिती, पुजारी, व्यवस्थापक यांना अतिशय उत्साह देण्यात आले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीला मंदिरातील स्वच्छता आणि रोषणाई, दीपोत्सव करण्याचे आवाहन निलेश देव मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे. २२ जानेवारी अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा होत असताना अकोलेकर देखील या सोहळ्यात विविध उपक्रमातून स्वयंस्फुर्तीने अग्रेसर आहेत. 
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा असताना अकोल्यातील बिर्ला राम मंदिरात एक लक्ष वेळा रामरक्षा पठनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्यात शालेय विद्यार्थीनी व तीन हजारांवर मातृशक्तीचा सहभाग राहणार आहे. या सोहळ्यानिमित्त तीन हजारांवर मातृशक्तीने सहभागासाठी नाव नोंदविले आहे. या सोहळ्यात मातृशक्तीने मोठ्या संख्येेत उपस्थित राहत रामरक्षा पठनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निलेश देव मित्र मंडळाने केले आहे.

    Post Views:  79


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व