मुख्य पोस्ट कार्यालय अकोला येथे डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात मतदानाचा संकल्प
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Apr 2024, 8:25 AM
अकोला : स्थानिक मुख्य पोस्ट कार्यालय अकोला येथे मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात पोस्टातील कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याचा संकल्प घेतला . दि.१९ एप्रिल २०२४ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , स्वीप कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व समाज कल्याण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमात मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष विशाल कोरडे यांनी उपस्थित कर्मचारी व सामान्य नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान केले . पोस्ट कार्यालयातील दिव्यांग मतदारांची डॉ कोरडे यांनी भेट घेतली . त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या . दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था केली असून ज्यांना ही सोय हवी आहे त्यांनी ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे यांनी दिली . या कार्यक्रमात मुख्य पोस्ट कार्यालयातील अभय कुलट,संजय टिकार,शरद शेंडे , नारायण खिरेकर , विवेक गवळी , विनय गवळी , गजानन इंगोले , अमित जोशी , संतोष हागे , राहुल चिमुरकर, संजय ठाकरे, विद्या ढेपे, शारदा काळने, सुनंदा पांडे, कल्पना सोळंके, संगीता बढे, मोहिनी धर्माळे, स्नेहा वाघमारे, सविता बागडेहरिया, सोनिया चाफेकर व विनोद इंगोले हया कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेऊन येणाऱ्या सर्व ग्राहकांना आम्ही मतदानासाठी प्रेरित करू अशी ग्वाही दिली . मतदार साक्षरता अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या श्रीकांत कोरडे ,अस्मिता मिश्रा,अमित सोळंके,गणेश सोळंके, सिद्धार्थ ओवे, अनामिका देशपांडे, संजय तिडके , विशाल भोजने व पूजा गुंटीवार या सदस्यांनी सहकार्य केले .
Post Views: 203