ब्रम्हपूरीच्या वाळू घाटातून महिन्याला पंधरा कोटींची वाळू तस्करी
शासनाला पाच कोटींचा चुना लागूनही प्रशासनाची डोळेझाक का?
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Jun 2022, 9:39 AM
ब्रम्हपूरी : ब्रम्हपूरी तालूक्यातील सहा वाळू घाटातून दर महिन्याला अंदाजे पंधराशे कोटीच्या वाळूचे उत्खनन होत असून यामधून महसूलापोटी अंदाजे आठ ते दहा कोटी रूपयेच फक्त शासनाच्या तिजोरीत जमा होत असल्याची खळबळजनक माहिती आहे.बाकी अंदाजे पाच कोटीच्या वाळूची राजरोसपणे अवैध तस्करी होत असून शासनाच्या कर्तव्यतत्पर अधिकारी कर्मचाऱ्यांचे या गैरमार्गाने मलिदा लाटणाऱ्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष का होत आहे, याबाबत नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या अवैध कारनाम्यांपासून प्रशासनातील अधिकारी अनभिज्ञ आहेत असे म्हणता येणार नाही. मग मतलबी हितसंबंधातून या वाळू माफियांना हेतूपूरस्पर सांभाळले जात असेल तर ती राज्यातील महसूल संकलन कार्य तथा शासनाच्या सेवाकार्याच्या कर्तव्याशी शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी केलेली दखलपात्र प्रतारणा आणि गैरप्रकार ठरत आहेत.
तीन चार वर्षांपासून प्रलंबित वाळू घाटाच्या लिलाव प्रक्रीयेत सहा घाटांचा यावर्षी लिलाव झाला.याठीकाणच्या अर्थार्जनाच्या चोरवाटेत राजकारणी आणि वाळूतस्करही चांगलेच उतरलेले आहेत.या संधीचे सोने करून घेण्यासाठी छोटे मोठे राजकारणी आणि वाळू तस्कर प्रशासनाला हाताशी धरून अवैध माया कमावण्यासाठी अधिकाऱ्यांनी खुल्या सोडलेल्या या वाहत्या गंगेत येथेच्छ डूबक्या मारण्यासाठी जोरात सक्रीय आहेत.
हे अधिकारी शासकीय कर्तव्याशी बेइमानी करून या राजकीय लोकांना सांभाळणे स्वत:साठी फायदेशीर समजत आहेत. वेतन शासनाचे आणि सेवा मात्र तस्करी करणाऱ्या वाळू माफियांची करतांना दिसत आहेत.यामुळे शासनाच्या महसूली तिजोरीवर डल्ला मारण्यात काही राजकारणी आणि वाळू तस्करांसोबतच शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही अपराधी आहेत,हे या चोरट्या उद्योगातून सिध्द होते आहे. शासनाची प्रचंड फसवणूक करीत
या वाळू तस्करीत करोडोची कमाई करणारांनी कास्तकारांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांची वाट लावलेली असून पर्यावरणाला बाधा निर्माण केलेली आहे. स्वतःच्या अनैतिक व्यवसायासाठी घाम गाळणाऱ्या अन्नदात्यांची रस्त्यांसाठी त्यांनी पार दैन्यावस्था करून सोडली आहे. विविध क्षेत्रातील राजकारणी या चोरट्या मार्गात आपले बस्तान बसविण्यास सक्रीय असून नागरीकांना सेवा देण्यात मग्रूर वागणूक देणारे हे अधिकारी मात्र या तस्करांसमोर नतमस्तक आहेत.या आर्थिक डल्लेबाजीत सर्वांची मिलीभगत असून ही मंडळी बिनधास्तपणे आपले काळे उद्योग करीत करीत आहेत. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना अनैतिक मलिद्याच्या प्रलोभनाने त्यांनी आपल्या दावणीला बांधून ठेवलेले आहे. शासकीय सेवेत आपल्या कृतघ्नतेचे दर्शन घडविणारे हे अधिकारी कर्मचारी वाळूतस्कर राजकारण्यांच्या हातची बाहूले बनलेले आहेत.अशा संतप्त प्रतिक्रीया नागरीकांमधून व्यक्त होत आहेत.
स्वतःच्या स्वार्थासाठी शासकीय महसूलाचे करोडो रूपयांचे नुकसान करून आपली उखळे पांढरी करून घेणारे हे गैरकारभारी अधिकारी कोण याची चौकशी वरिष्ठांमार्फत शासनाने उच्च स्तरावरून करावी आणि महसूल बूडविण्यात हातभार लावणाऱ्या अपराध्यांवर कारवाई व्हावी. अशी ब्रम्हपूरीवासियांची मागणी आहे.
Post Views: 229