फार्मर्स कट्टाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज उद्धाटन


सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गटाचा उपक्रम
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  01 Apr 2022, 8:05 PM
   

अकोला -  सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गटच्या माध्यमातून रसायनमुक्त शेतकरी उत्पादीत अन्नधान्य, फळे, मसाले इत्यादी साहित्य शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. गुढीपाढवाच्या  मुहूर्तावर येथील जवाहर नगर येथे ‘फार्मर्स कट्टा’ शाखा दोनचे शुभारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज (दि.2) होणार आहे.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे तर निमंत्रक तालुका कृषि अधिकारी विलास वाशिमकर, सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गट, कातखेडचे अध्यक्ष रुपेशजी पाटील लडे, सचिव वर्षा चव्हाण आदि उपस्थित राहिल.

    Post Views:  159


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व