कापसाचे उत्पन्न कमी, मजुरी जास्त!...शेतकरी संकटात.!


वेचणीसाठी प्रतिकिलो बारा रुपये मजुरी,तर भाव साडेसहा हजार प्रति क्विंटल
 मंगेश चराटे  07 Jan 2024, 3:02 PM
   

 अकोला तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती 
खंड आणि आता अवकाळी पाऊस व त्यात बोंड अळी यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. त्यातच कापूस वेचणीसाठी मजुरांना १२ रुपये प्रतिकिलो द्यावे लागत आहेत. तर बाजारात कापूस नेल्यावर साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. त्यामुळे कापूस लागवडीवर उत्पन्नापेक्षा वेचणी व इतर खर्च जास्त लागत आहे यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.यावर्षी कोरडवाहू शेतीत कापसाच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे.एकरी फक्त तीन क्विंटलची शक्यता असून शेतकऱ्याचा साधा खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली 

उत्पन्नापेक्षा वेचणी महाग अवकाळी पावसानंतर जवळपास ५०% कापसाचे उत्पन्न हाताशी गेले आहे. कापसाने वेचणी कठीण झाली आहे. चांगल्या प्रकारच्या कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार तर औल्या झालेल्या कापसाला प्रत्येक निचटल तीन ते पाच हजार इतकाच दर आहे. मागील वर्षी कापसाला जवळपास सहा हजार पाचशे ते नऊ हजार पेक्षा जास्त दर होता. प्रतिकिलो कापूस वेचणीसाती पूर्वी ८ ते १० पर्यंत मजुराना द्याचे लागत होते, मात्र आता १२ रुपये पेक्षाही प्रतिकिलो जस्त मजुरी द्यावी लागत आहे.

-----------------------------------------------------------------------
निवडणुकीच्या आशेवर जास्त लागवड
यंदा लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा अंदाज घेत, शेतकऱनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन कापसाला चांगला भाव देईल, अशी अपेक्षा ठेवून लागवड केली होती; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला,

--------------------------------------------------------------
कापूस झाडावरच
"काही शेतकरयांनी कापूस वेचला, मात्र, आता कापसाला भाव येईल, या आरोने तो साठवणूक करुन ठेवला आहे. मात्र, ज्या मजुरांनी कापूस वेचला त्याची रक्कम देण्यासाठी कापूस कवडीमोल भावात विकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, हा प्रकार लक्षात येताच मजुरी परवडण्यासारखे नसलेल्या ठिकाणी शेतकयानी कापूस झाडावरच ठेवला आहे. बाहेर गावातून मजूर आणण्याकरिता आणि परत सोडण्याकरिता वाहनाचा खर्चही शेतकयांनाच करावा लागतो

कापूस उत्पादनासाठीचा एकरी खर्च
नांगरटी -२००० रोटर ९२००
सर्या पाडणे-१००० • बियाणे (२ बैंग) १६०० मजुरी (लागवड खते - ८००० ६००
• निंदण/ कोळपणी (तीन किवा चार] - (७००० ते ८००० • फवारणी (चार किवा पाच) - ७०००
कापूस वेचणी (क्विंटलमागे। 1300 एकूण उत्पन
५ ते ८ क्विंटल एकूण खर्च ३५००० ते ४००००

कापसाल भाव नाहीं, त्यात कापूस वेचणीचे दर वधारले आहेत. सुरुवातीचा कापूस १० ते १२ रुपये किलोने वैचला गेला. आता मंजूर मिळत नसल्याने १५ रुपये किलोपर्यंत दर द्यावा लागत आहे. - 
गणेश कात्रे शेतकरी उगवा 

तीन हेक्टरवर कापूस 
लागवड करण्यात आली होती; मात्र अवकाळी पावसामुळे संपूर्ण कापसाचे नुकसान झाले आहे यापुढे कापूस लागवड करावी की नाहीं. असा विचार मनात सातत्याने वेत आहे. 
- निलेश वसंतराव मालोकार निंबी मालोकार 

अवकाळी पावसामुळे कापून पिकाचे मोठे नुकसान झालाने आहे. वेचणीसाठी मजुर मिळत नाही आणि मिळाले तर वेचणीचे दर उत्पन्नापेक्षा जास्त महाग आले आहे. एकंदरीत शेती करणे अवघड आले आहे. - निवृत्ती मेतकर , शेतकरी चिखलगांव ,

    Post Views:  120


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व