गणेश उत्सव समितीकडून न्यू तापडीया नगरात सामुदायिक आरोग्य शिबीर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2024, 10:41 AM
   

अकोला-- श्री नाथ विहार गणेश मंदिर उत्सव समितीच्या वतीने राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षांतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
खरीप रोडवरील श्री गणेश मंदिरासमोर या आयोजित शिबीराचे न्यू तापडीया नगर व खरप परिसरातील असंख्य रूग्णांची तपासणी करण्यात आली.जवळच वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरीकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
       यावेळी डॉ.सचिन धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.वैष्णवी देशमुख, डॉ.प्रियंका गावंडे, डॉ.प्रगती शेंडे, डॉ.रूपाली लहासे या डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्य मार्गदर्शन केले. खासदार श्री.अनुपभाऊ धोत्रे व आमदार श्री.रणधीरभाऊ सावरकर यांच्या सहकार्याने राजेश शिंगोकार,अतुल 
गोंधळीकर,शंकर धामोडे,गणेश सोनेरी रामकीसन  श्रीवास व सहकारी मित्रांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

    Post Views:  107


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व