लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर यांच्या वतीने आचार्य स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती हर्ष उल्हसत साजरी....


 देवेंद्र मेश्राम  12 Jan 2024, 10:55 PM
   


पालघर 
लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य स्व.बाळशस्त्री जांभेकर यांची जयंती सिडको जवळील लोकमत चे पत्रकार व लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे कोकण विभाग प्रमुख पंकज राऊत यांच्या ऑफिस मध्ये साजरा करण्यात आला.सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून आचार्य स्व.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या बद्दल मनोगत श्यामसुंदर आटे यांनी मांडले.सर्व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कोकण विभाग प्रमुख श्यामसुंदर आटे,विठोबा मराठे,जिल्हा अध्यक्ष जगदीश प्रसाद करोतिया,कार्यध्यक्ष संतोष राणे,कोषाध्यक्ष विजय बोपर्डीकर,सचिव संतोष घरत,संघटक संपत उजाला, प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम,सदस्य प्रशांत करोतीया,सदस्य सादिक शेख आदी महासंघाचे पदाधिकारी या जयंती उत्सव साजरा करण्या साठी उपस्थित होते.

    Post Views:  138


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व