बोईसर -(संतोष घरत) : पालघर मधील नागझरी ते चिंचपाडा या मुख्य रस्त्यावरील किराट- बोरशेती रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार कोण ?अवजड वाहतूक करणारे दगड ,खडी क्रेशर वाले की ठेकेदार असा प्रश्न सामान्य जनतेला निर्माण झाला आहे विक्रमगड चा ठेकेदार कमी दरात (बिलो) कामे घेण्यात जोमात असून किराट रस्ताच, जणू काही कोमात गेल्याचे दिसत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या निधीमधून किराट- बोरशेती रस्त्याचे काम २५ लाखाचे टेंडर २४% टक्के कमी दराने (बिलो) भरून ठेकेदार केदार सावंत ह्याने बाजी मारून सदर रस्त्याचे काम घेण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासून आज पर्यंत एका महिन्यात दोन दिवस काम चालू व आठवडाभर काम बंद असे कासवाच्या गतीने काम चालू आहे. अशा या ठेकेदाराला येथील जनता व रस्त्याने जाणारे प्रवासी हैराण झाले आहेत .ह्याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व उप अभियंता संजय कुलकर्णी ह्याने ठेकेदाराला वारंवार सांगून सुद्धा व नागरिकांनी सदरच्या ठेकेदाराला फोन करून काम पूर्ण करण्याची विनंती करून सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे .कारण सदर काम हे ठेकेदाराने २४% टक्के कमी दराने (बिलो) घेतल्याने व येथील नागरिक व प्रवासी जागरूक असल्याकारणाने चांगल्या दर्जाचे काम करून घेणार , ह्या सर्व अडचणी बघता जाणून बुजून कामा मध्ये ठेकेदार चालढकल करत आहे, एका महिन्यावर पावसाळ्यात नेऊन ठेपला असताना, जर असेच काम बंद राहिल्यास रस्त्याने जाणारे प्रवाशी, चाकर मनी, शाळकरी विद्यार्थी , व रुग्णांना अडचणींना तोंड द्यावे लागेल, तरी सदर ठेकेदाराला काळया यादीत ( ब्लॅक लिस्टमध्ये )टाकावे व अपूर्ण राहिलेले काम पावसाळा येण्यापूर्वी करून घ्यावे , अशी जनतेची मागणी आहे. सदर प्रकरणाकडे अभियंता कोणता निर्णय घेतात व ठेकेदारावर काय कार्यवाही करतात हे पाहणे औचित्याचे ठरेल.
Post Views: 305
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay