सुनील श्रीराम चौधरी यांना आचार्य पदवी प्राप्त.


 संजय देशमुख  08 Feb 2022, 1:04 PM
   

वडसा : स्थानिक मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय वडसा येथे प्राणीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले सुनील श्रीराम चौधरी यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आचार्य पदवी प्राप्त झाली. त्यांनी प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे, ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विषयात ड्रॅगनफ्लाय हाईंडगट वर संशोधन करून गोंडवाना विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केले. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. सुरेश बाकरे सर डॉ. अमीर धंमानी सर, डॉ. कोकोडे सर, डॉ. आशिष सेलोकर सर, आई-वडील, पत्नी, नातेवाईक व त्यांना संशोधनात मदत करणाऱ्यांना मित्रमंडळींना दिले.

    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व