जागतिक परिचारिका दिनानिमित्त श्रीमती कांचनमाला डहाके व सौ.अलका पापडकर यांना कस्तुरीचा सदाफुली पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 May 2025, 11:34 AM
   

अकोला : आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगल यांची जयंती व जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून कस्तुरी या सामाजिक संस्थेने अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिसेविका श्रीमती कांचनमाला डहाके व प्राथमिक आरोग्य केंद्र , आगर येथून निवृत्त झालेल्या आरोग्य सेविका सौ.अलका शंकरराव पापडकर यांना, सदाफुली पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.. .... जगभरातील  परिचारिकांचं  अमूल्य योगदान  व सेवाकार्याच महत्त्व अधोरेखित करण्यासाठी , त्यांच्या कार्याचा गौरव आणि सेवावृत्ती विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभर जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो.... परिचारिकांचे परिश्रम आणि निस्वार्थ समर्पण आरोग्य सेवा प्रणालीचा भक्कम पाया आहे. साथीच्या काळात त्यांच्या विलक्षण त्यागाची अनेक उदाहरणे मानव जातीला प्रेरणा देणारी आहेत...
... अशा या महान सेवाकार्याची आपण ही दखल घेतली पाहिजे  या उदात्त भावनेतून  कस्तुरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक ' परिचारिका दिन' साजरा करण्यात आला... ज्याप्रमाणे सदाफुली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे वर्षभर बहरत असते व तिच्या अंतर्भूत सद्गुणांचा समाजाला  अविरत उपयोग होत असतो ... त्याचप्रमाणे परिचारिका देखील ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता वर्षभर रुग्णांची सेवा करत असते तिच्या या समर्पित सेवेची दखल घेऊन कस्तूरी ने श्रीमती कांचनमाला डहाके आणि सौ. अलका पापडकर यांना
सदाफुली पुरस्काराने सन्मानित  केले..शाल, श्रीफळ गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह व गंधकस्तुरी स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरूप होते...
       यासमयी कस्तूरी या सेवाभावी संस्थेने  केलेल्या  सेवाकार्याची दखल घेतल्याबद्दल कस्तुरीविषयी कांचन डहाके व सौ. अलका पापडकर यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपण केलेला सन्मान हा सर्वोच्च असून तो श्रींचा प्रसाद आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली...
... कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.शांताराम बुटे, सौ. करुणा बुटे, वसंतराव खोटरे, प्रा. प्रभाकर पाटील, संजय गायकवाड,  संजय ठाकरे, अनिल पालवे, वसंतराव देशमुख, राम भिरड, चेतना आनंदानी, ज्योती लोकवानी, सौ. संगीता जोध ,राजेश्वर पेठकर , दामोदर नुपे व सौ.अलका पापडकर व कांचनमाला डहाके या दोन्ही 
कुटुंबातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

    Post Views:  101


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व