एल.आर.टी. कॉलेजच्या एन.सी.सी. विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Oct 2024, 9:04 AM
श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोलाच्या एन.सी.सी. विभागातर्फे प्राचार्य डॉ. आर. डि. सिकची यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. वर्षा सुखदेवे, प्रमुख मार्गदर्शक स्टुडन्ट फोरम स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक श्री. विजेंद्र वरोकार, एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन डॉ.अनिल तिरकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी प्रस्तावना व वक्त्यांचा परिचय करून देतांना म्हणाले की, मानवी जीवन हे परीक्षांनी भरलेले असते. परीक्षांच्या मैदानातून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मार्ग जातो. परीक्षा कुठलीही असो त्याला सामोरे जाणे महत्वाचे असते. परीक्षा देऊनच आपला परिपूर्ण विकास होत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण फोकस अभ्यासावर द्यायला पाहिजे. प्रमुख मार्गदर्शक श्री. विजेंद्र वरोकार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी आपण सारख्याच चुका करतो किंवा सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या तेवढं लक्षपूर्वक करत नाही. या सर्व प्रश्नांवर एकच उपाय आहे रेडीमेड मटेरीयल पेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. विद्यार्थ्यांसोबत दिलखुलास चर्चा करून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टीचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वर्षा सुखदेवे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले तसेच त्यांच्या परीक्षा काळातील अनुभव सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे संचालन कॅडेट सिमरन इंगळे आणि आभार कॅडेट श्रद्धा पांडे हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्जेंट स्वराज बोदडे, यश कमलाकर, प्रेम अहिर, आयुष थोरात, समर्थ दुबे, गुणवंत गुजर, यशवंत हरसुलकर, सोकांश धवने, हर्ष देवगिरीकर, अब्दुल आवेस, पवन गिरी, सुमित मंगुळकर, क्रिश करवादिया, ओम भरती, अविनाश वाकोडे, आदित्य टाले, सूरज ठोसर, पियूष धांडे,वैभव काळपांडे, वेदांत वैराले, प्रथमेश वसत्कार, निखिल मोरया, स्वानंद चौधरी, सत्यम टोंगळे, धनराज जाहीर, सारिका यादव, लक्ष्मी सुले, उर्मिला बुंदेले, धनश्री दाणे, प्राची वरुडकर, मानसी दळवी, आरती कोंडेकर, प्रेरणा गोतमारे, कोमल मेश्राम, निवेदिता भोसले, निशा अरुलकर, सानिका राजेघर, पल्लवी शिरसाट, दिव्या बावस्कर, जानवी पारसकर, तृष्णा सिंघ, कल्याणी सोनुले, प्रांजल लांडगे, अनुजा देशपांडे, प्राजक्ता मोग्रे, क्षितिजा जामदार यांनी बरीच मेहनत घेतली.
Post Views: 20