महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास, गुन्हे दाखल


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2022, 9:04 PM
   

अकोला : शहरातील लहान उमरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील साखळी व मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
लहान उमरी परिसरातील नरेश चव्हाण हे  घराजवळच असलेले लग्नसमारंभ आटपून आपल्या सूनेसोबत घरी जात होते. यादरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी त्यांच्या सुनेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे अंदाचे 4 लाखांचे मंगळसूत्र व हार हिसकावून लंपास केले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने चोरटे कोणत्या रस्त्याने गेले, हे कळणे कठीण आहे. याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिक तपास करीत आहेत.

    Post Views:  292


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व