रशियाचा युक्रेनमध्ये विध्वंस; साडेपाच हजार नागरिक मृत्युमुखी


रशिया व युक्रेनमध्ये चर्चा
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Feb 2022, 8:17 PM
   

कीव : रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम जगासमोर येत असून, यामध्ये आतापर्यंत 5300 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. युकेनमधील मानवी वस्त्यांवर आता हल्ले होत असल्याने नागरिक जीव वाचविण्यासाठी पळून जात आहे. रशियाने एकीकडे चौफेर नाकाबंदी करून युक्रेनला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले असले तरी युक्रेनही रशियन सैन्याला चोख उत्तर देत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. रशियाने या युद्धात आपले किती नुकसान झालेय याची माहिती दिली आहे. रशियाचे उप संरक्षण मंत्री हन्ना मलियार यांनी सोमवारी सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या चार दिवसांच्या लढाईत एकूण 29 विमाने, 29 हेलिकॉप्टर आणि तीन अनमॅन्ड एरियल व्हीकल गमावली आहेत. तसेच पाच हवाई संरक्षण प्रणालीचेही नुकसान झाले आहे. तसेच रशियाने युक्रेनचे 191 रणगाडे, 816 लढाऊ वाहने, 291 वाहने आणि दोन जहाज पाडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
लष्कराने 74 तोफा, एक बक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 21 ग्रॅड मल्टिपल रॉकेट लॉन्चर गमावल्याची माहिती, रशियाच्या उप संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तसेच युक्रेनच्या 5300 जणांना आतापर्यंत ठार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महत्वाची बाब अशी की हा आकडा आणखी वाढू शकतो. 
युक्रेन विरुद्धच्या युद्धात आपले अनेक सैनिक मारले गेल्याचे रशियाकडून रविवारी मान्य करण्यात आले. आमचे काही सैनिक शहीद झाले आहेत. तर काही जखमी झाले आहेत, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव यांनी सांगितलं. पण त्यांनी नेमका आकडा यावेळी जाहीर केला नाही. युक्रेनच्या तुलनेत रशियाचं नुकसान खूप कमी झाल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. यु्क्रेनच्या एकूण 1067 लष्करी तळांना आतापर्यंत लक्ष्य करण्यात आले आहे. यात 17 कमांडिग पोस्ट आणि संपर्क केंद्रांचा समावेश आहे. तसेच 38 डिफेंन्स मिसाइल सिस्टम आणि 56 रडार प्रणालीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. 
युक्रेनची चर्चेची तयारी
युक्रेनने बेलारूस सीमेवर रशियाशी चर्चा करण्याची सहमती दर्शवली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आपातकालीन बैठकीत रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री दिमित्री कुलेबा यांनी स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही आत्मसमर्पण करणार नाही किंवा एक इंचाचीही जमीन रशियाला सोडणार नाही.

    Post Views:  163


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व