जि प प्राथ केंद्रशाळा नायफड येथे शाळा पूर्वतयारी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेसाठी केंद्रप्रमुख श्री.भरतराव लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये नवीन येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमावर आधारित, नवीन येणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळा पूर्व प्रशिक्षण देताना अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक,स्वयंसेवक व पालक यांच्यासोबत शाळापूर्व तयारी 12 आठवडे करून घ्यावयाची आहे.
शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाकरिता सुलभक म्हणून श्री. दत्तात्रय आढाव व श्री. संभाजी सरड यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना स्टॉलवर आणताना ढोल ताशाच्या गजरात फेटे बांधून शालेय स्टॉलकडे आणण्यात आले. प्रशिक्षणात शाळा पूर्वतयारी करीता विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते. त्या स्टॉलवर प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक यांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.हा कार्यक्रम एकूण 12 आठवडे चालणार असून विद्यार्थी पूर्वप्राथमिक स्तरावरुन जेव्हा प्राथमिक शाळेत दाखल होणार आहे त्या वेळेस तो निर्भीड व आनंददायी वातावरणात शालेय परिसरात यावा. यासाठीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक हे श्री.अशोक फसले, श्री. देवेंद्र कोकाटे, श्री.अरुण अस्वले,श्री.राजेंद्र राठोड,श्री. संजयकुमार वाळके, श्री. सूर्यकांत केंगले,श्री.बापूराव दराडे, श्री. दुलाजी तिटकारे, श्री.बजरंग सुपे, श्रीम.जयश्री सातकर श्रीम. देवयानी काशीद,श्रीम. मोनिका नाटे यांनी करून दाखवले. शाळापूर्व प्रशिक्षणाचे मार्गदर्शक खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.जीवनजी कोकणे, प्रस्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भरतराव लोखंडे,मनोगते श्री.विजयकुमार शेटे व श्रीम.हिनाकौर शहा, व्यवस्थापन श्री.धनराज अचवलकर, सूत्रसंचालन श्री.विशाल शिंदे व आभार श्री.भास्करराव बुरसे यांनी मानले.
Post Views: 505