राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त वृक्षारोपण मोहिम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2024, 8:45 AM
   

अकोला : यंदा राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त एक पेड मां के नाम  ही विशेष वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी दिली. त्या म्हणाल्या, संपूर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येईल. जिल्ह्यातील १ हजार ३१५ अंगणवाड्या व ७ प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येतील. त्यानिमित्त सर्व अंगणवाड्यांमध्ये उद्या (३१ ऑगस्ट) सकाळी दहा वा. विशेष वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञाही यावेळी घेतली जाईल.

    Post Views:  20


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व