श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखीचा अकोला वरून पातुर कडे प्रवास प्रारंभ.
अकोला : गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथील निघालेला पैदलरवारी पालखीचा प्रवास पातुर कडे प्रारंभ झाला असून आज सकाळी सात वाजता पातूर रोडवरील प्रभात किड्स येथे रात्री मुक्काम व जेवण आटपून आज सकाळी येथून चहापान फराळ घेऊन या ठिकानी प्रभात कीडीसचे संचालक गजानन नारे यांनी या पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले.
हे स्वागत शिकारून पालखी पातुर कडे निघाली जय हरी माऊली, जय जय राम कृष्ण हरी ,पालखी हिंगणा फाट्यावर या पालखीचे स्वागत करण्यात येऊन चहापान दूध तसेच रेनकोट चे वाटप करण्यात आले त्यानंतर अनेक अभंगाचा गजर करत अनेक फाट्यावर स्वागत शिकारीत ही पालखी चिखलगाव येथील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांच्या घरी चिखलगाव येथे बारा वाजता पोचली
त्यानंतर येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली फुगडी रिंगण आधी करुन गावकऱ्यांचे मन जिकले त्यानंतर स्नेह महाप्रसादाचा आनंद उपस्थित भक्तगणांनी घेतला. यावेळी माननीय आमदार गोवर्धन शर्मा, तेजराव पाटील थोरात, गावातील गणमान्य मंडळी पालखीचे स्वागत करण्या करिता उपस्थित होते. दुपार प्रवचनाचा कार्यक्रम चिखलगाव येथे पार पडला त्यानंतर पालखी पातुर कडे निघाली अनेक गावांना फाट्यावर स्वागत शिकारीत पातूर मुक्कामी पोहोचली. ???? प्रकाशनार्थ ???? माननीय संपादक साहेब. आपला स्नेही ???? गजानन हरणे खडकी अकोला.
Post Views: 245