परळीत चोरट्यांनी संपादकाचेच घर फोडले पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) परळी शहरातील सुर्वेश्वर नगर भागातील रहिवाशी परळी पोलखोल चे संपादक यांच्याच घरी चोरांनी डल्ला मारून, घर फोडून अज्ञात चोरट्यांनी पावणे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २५ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदूबाई भगिरथ बद्दर (वय ४६) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी घरातील दिवाणमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी २५ जानेवारी रोजी चोरून नेले. ते दागिने ५ लाख ७६ हजार रुपयांचे होते.
या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३८० भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस अंमालदार हरीभाऊ घुमरे हे करत आहेत.
Post Views: 261